Crime_Suicide 
पुणे

हुंड्यासाठी सासरचे करायचे छळ; जीवनाला कंटाळून विवाहितेनं घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माहेरून हुंडा घेऊन येण्याची मागणी करीत सासरच्यांच्याडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वारजे येथील 20 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी विवाहितेचा पती, दीर आणि सासूला अटक केली आहे.

रविवारी (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास वारजे गावठाणातील महादेव मंदिराशेजारी असलेल्या घरी प्रगती विशाल बराटे (वय 20) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांची आई संगीता हरपळे (वय 42, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. पती विशाल मनोहर बराटे (वय 30), दीर तुषार मनोहर बराटे (वय 32) आणि सासू रोहिणी बराटे (वय 50, सर्व रा. वारजे गावठाण, रामनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रगती यांचे विशाल बरोबर मे 2019 साली लग्न झाले होते. तेव्हापासून त्यांना "तू फुकटात आली. त्यामुळे आम्हाला हुंडा म्हणून 50 हजार रुपये आणि दिवाळीला सासरकडील लोकांना देण्यासाठी दोन तोळे सोने आण, असे म्हणत त्यांना त्रास देण्यात येत होता. टोचून बोलणे, शिवीगाळ आणि मारहाण करून तिला सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे करीत आहेत.

विवाहितेचा छळ केल्याचा दोन घटना उघड :
इलेक्‍ट्रिकचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगत मुंढव्यात एका विवाहितेचा छळ करण्यात आला. याबाबत 26 वर्षीय महिने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिचा पती बशीर अहमद, सासू हसीना, दीर रियाज अहमद, नणंद नूरजहॉं यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणेश मळा परिसरातील एका विवाहितेकडे माहेरून 15 लाख आणि कार घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार सुमीत सुधीर पांढरे, सुधीर नारायण पांढरे आणि अमित सुधीर पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT