corona_checkup 
पुणे

Lockdown : 'होम टू होम' सर्व्हेनुसार 300 घरांची तपासणी!

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : कॅन्टोन्मेंट हद्दीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हाऊस टू हाऊस सर्व्हे करण्याचे काम पथकांच्या माध्यमातून सुरू आहे. आतापर्यत आठ वॉर्डातील तीनशे घरांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. उर्वरित घरांची तपासणी पुढील काही दिवसांत पूर्ण होईल अशी माहिती प्रशासानातील अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्ड प्रशासनाने कॅन्टोन्मेंट भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होम टू होम तपासणी सुरू केली आहे. आतापर्यत सुमारे तीनशे घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाने कोरोनाबाबत दिलेल्या विशेष सूचनांनुसारसुद्धा परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

याबबत माहिती देताना कॅन्टोन्मेंटच्या पटेल रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड म्हणाले, “गेल्या चार ते पाच दिवसांपासून पथके हाऊस टू हाऊस तपासणी करीत आहेत. या शिवाय केंद्र आणि राज्य शासन आयडीएचपी या संकेतस्थळावर परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती देत आहे. त्यानुसार कॅन्टोन्मेंट भागात परदेशातून नागरिक आला आहे काय, आला असल्यास त्याची माहिती घेण्यात येत आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्परतेने कामकाज सुरू केले आहे. हद्दीमधील आठही वॉर्डमधील घरांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डसाठी एक या प्रमाणे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये एक डॉक्टर, एक परिचारिका, प्रशिक्षित स्वयंसेवक, समुपदेशक यांचा समावेश आहे. पथकामधील सर्वांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT