nana patole 
पुणे

Kasba Peth Bypoll Election : कसब्यात काँग्रेसचे उमेदवार ठरले! नाना पटोले नावं हायकमांडला पाठवणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. (Kasba Peth Bypoll Election)

दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारांनी नावे ठरली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ही नावे दिल्लीच हायकमांडला पाठवणार आहेत.

कसबा पेठ मतदार संघासाठी ५ नावे ठरले आहेत. कसबा पेठ विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. दरम्यान संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर आज निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. 

मतदान कधी?

या पोटनिवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT