ncp 
पुणे

अबब, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55 हजार तरुणांनी मागितली नोकरी

डाॅ. संदेश शहा

इंदापूर : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रवादी ऑनलाइन नोकरी महोत्सवात 55 हजार जणांनी आपले अर्ज बायोडाटासह दाखल केले असून, त्यांची शिक्षण, अनुभवानुसार क्रमवारी करण्याचे काम सुरू आहे.

या उपक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस युवा पिढीस पात्रते
नुसार नोकरी देण्यास कटीबद्ध असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.  इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, बाळासाहेब करगळ आदी उपस्थित होते. 

गारटकर यांनी सांगितले की, कोरोनामुळे जाहीर केलेली संचारबंदी आता शिथील करण्यात आली आहे. मात्र, सध्या औद्योगिक वसाहतीत फक्त 25 टक्के कामगार आहेत. त्यामुळे स्थानिक युवापिढीस नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे व उद्योग- व्यवसाय वाढावेत, यासाठी हा उपक्रम फक्त पुणे जिल्ह्यापुरता घेतला होता. मात्र, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या उपक्रमाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राज्य पातळीवर पोहोचवला. त्यामुळे संपूर्ण राज्यातून 55 हजार ऑनलाइन अर्ज आले आहे. या अर्जांची कंपनीच्या गरजेनुसार वर्गवारी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी व्यावसायिक कंपन्यांची मदत घेतली जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत कंपनीमध्ये स्थानिक कामगारांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता या उपक्रमामुळे होत आहे. मात्र, मराठी युवा पिढीने या संधीचा फायदा घेऊन आपल्या कुटुंबाचे रहाटघाडगं पूर्वपदावर आणावे. 
 - प्रदीप गारटकर
अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

Panchang 18 March 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! इराक-इराण युद्धाची सोलापूरकरांना झळ; सोलापूर शहरात रिक्षा चालकांनी वाढविले १० ते १५ रुपये भाडे; कोणत्या मार्गावर किती भाडे? वाचा...

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2026

अग्रलेख : धर्मस्वातंत्र्याचे तारतम्य

SCROLL FOR NEXT