61st cavalry regiment indian army tanks instagde of horses
61st cavalry regiment indian army tanks instagde of horses 
पुणे

भारतीय लष्करात गौरवशाली प्रथा बंद होण्याची शक्यता; अश्वांच्या जागी आता...

अक्षता पवार

पुणे Pune News : भारतीय लष्कराची गौरवशाली असलेल्या अश्वदलातील अश्वांच्या जागी आता रणगाड्यांचा वापर केला जाऊ शकतो. शेकटकर समितीच्या वतीने भारतीय लष्करातील एकमेव अश्वदलातील अश्वांच्या ऐवजी रणगाडे वापरण्याचा प्रस्ताव शासना समोर मांडण्यात आला होता. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी दिली.

या शिफारशीनुसार लष्करात गौरवशाली असलेल्या घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. या बाबत शेकटकर म्हणाले, "लष्कराच्या या एकमेव अश्वदलचे मुख्यालय जयपूर येथे आहे. या दलातील अश्वांचा गेल्या 25 वर्षांपासून कोणत्याही कारवाईत केला गेला नसून केवळ नाममात्र राहिला आहे. इतिहासातील युद्ध आणि आताचे युद्ध यामध्ये फरक आहे. एका घोड्याच्या देखरेखीसाठी दोन ते तीन लोकांची गरज असते. त्यामुळे एका घोड्यावर वर्षभरात लाखो रुपये खर्च होतात. पण, याठिकाणी जर रणगाड्यांचा वापर केला तर नक्कीच दरवर्षी सुमारे 300 ते 400 कोटी रुपये वाचू शकतील व त्याचा वापर लष्करातील इतर गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. तसेच एका रणगाड्याची आयु ही 30 ते 35 वर्ष इतकी असते. त्यामुळे या अश्वांना आयएमए, एनडीए, ओटीए अशा विविध लष्करी संस्थांना किंवा राष्ट्रपती अंगरक्षकांना देण्यात यावे. तसेच संपूर्ण युनिटला बंद न करता त्यांच्या ऐवजी रणगाड्यांचा वापर करावा." सध्या समितीच्या वतीने शासनाकडे देण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या मान्यतेची कारवाई सुरू आहे. तर या शिफारशिला लवकरच मान्यता प्राप्त होईल असे शेकटकर यांनी सांगितले.

सध्या तंत्रज्ञांची प्रगती होत आहे त्याच बरोबर शास्त्र प्रणालीमध्ये सुद्धा विकास झाला आहे. दरम्यान अशा स्थितीमध्ये 21 व्या शतकात घोड्यावर बसून युद्ध केले जाऊ शकेल का ? वास्तविकतेचा विचार करत आता लष्करात बदल करणे अत्यावश्यक झाले आहेत. आधुनिक काळात युद्ध सीमेवर केवळ रंगाड्यांचाच वापर केला जातोय घोड्यांचा नाही. त्यामुळे अश्वांच्या ऐवजी या दलात रणगाड्यांना सामील करणे अधिक उपयुक आणि योग्य आहे. यामुळे युद्ध सीमेवरही याला वापरता येईल.
- लेफ्टनंट जनरल (निवृत्त) शेकटकर

जगातील एकमेव अश्वदल भारतीय लष्करात
संपूर्ण जगामध्ये भारतच एकमेव देश आहे ज्याच्या सैन्यदलात '61 अश्वदल' नावाचे अश्वदल आहे. या दलात सुमारे 500 अश्व आहेत. या दलाचा गौरवशाली इतिहास असून याची स्थापना ऑक्टोबर 1953 मध्ये जयपूर येथे झाली होती. क्रीडा क्षेत्रातही याचे मोठे योगदान आहे. या अश्वदलाने एक पद्मश्री, 10 अर्जुन पुरस्कार, 11 एशियन गेम्स मेडल मिळवले असून पोलो वर्ल्डकपमध्येही अनेकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. कित्येक दशके या अश्वदलाने राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्येही आपला सहभाग नोंदवला आहे.

'मेक इन इंडिया'ला चालना
लष्करासाठी टी-90 हा रणगाडा रशियाकडून विकत घेतला जात आहे. तसेच असे 500 रणगाडे घेतल्यानंतर याचे लायसन्स व तंत्रज्ञान या देशाकडून घेऊन या रणगाड्यांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल. तर फक्त भरतासाठीच नाही तर भारतातून करण्यात आलेल्या या उत्पादनाला इतर देशांना सुद्धा विकले जाऊ शकतात. यामुळे भारताच्या उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल. यामुळे 'मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया' आणि मेक इन इंडिया - मेक फॉर वर्ल्ड' ही कल्पना यशस्वी ठरेल. अशी माहिती शेकटकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT