balewadi1.jpg
balewadi1.jpg 
पुणे

पुण्याच्या सुपर आजीबाईंनी, कोरोनाला हरवले...

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : कोरोनाने पुणे शहरात हाहाकार माजविला आहे, आपण अनेक रुग्ण यामुळे मृत्युमुखी पडत असल्याचेही रोज ऐकतो. त्यातल्या त्यात लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते. बालेवाडी येथील निकमार महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमधील 24 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये एका 65 वर्षीय आजीचा पण समावेश आहे. 

ज्यावेळी या आजीबाईंना आपल्याला कोरोना झाला हे समजले त्यावेळी त्या खूप घाबरल्या. सतत देवाचा धावा करत होत्या. आपण यातून वाचणार नाही असं वाटत होतं, पण इथल्या डॉक्‍टरांनी त्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर नर्स आणि इतर सर्व स्टाफने त्यांचे मनोधैर्य वाढविल्यामुळे आज त्या कोरोना विरुद्धची लढाई जिंकल्याचे आजींनी सांगितले.

सुरवातीला त्यांना फक्त दोन ते तीन दिवस थोडा ताप, खोकला, सर्दी अशा स्वरूपामध्ये त्रास झाला. आजारावर मात केल्यामुळे त्या खूप आनंदी होत्या. या वेळी त्यांनी मातृत्व दिनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले. यांचे बोलणे ऐकून सगळ्यांचे मन गहिवरून आले. 

पुणेकरांनो, 'या' भागात पाच दिवस असणार कडक संचारबदी

निकमार महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमधील 24 रुग्णांना आज कोरोना मुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. या सर्वांना घरी सोडताना महापालिकेकडून तसेच डॉक्‍टरांकडून एक छोटेखानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ व अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच घरी गेल्यानंतर काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका असा मोलाचा सल्लाही दिला. 

परप्रांतीय मजुरांचा वनवास संपता संपेना... 

यावेळी या रुग्णांना सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. तसेच फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना निरोप देण्यात आला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

यावेळी उपायुक्त नितीन उदास, सहआयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय जयदीप पवार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, नगरसेवक अमोल बालवडकर, जयंत कांबळे, मीनल पाचुंदे तसेच या भागातील सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT