corona1 
पुणे

दौंडकरांना कोरोनाच्या लढाईत मोठे यश

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा सहाशेपार झाला असून, त्यापैकी ७१.१४ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तालुक्यात आज सहा जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्यामध्ये माजी उपनगराध्यक्षांच्या पत्नीचा समावेश आहे.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
                
दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ७ ऑगस्ट या १०१ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६२७ बाधितांपैकी ४४६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण २९३ जणांना बाधा झाली व त्यापैकी तब्बल २१९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. दौंड शहरात १ मे ते ७ ऑगस्ट या कालावधीत एसआरपीएफ, आयआरबीच्या पोलिसांसह एकूण ३३४ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. शहराच्या बहुतांश सर्व भागात बाधित रूग्ण आढळले असून, उपचारानंतर एसआरपीएफ व आयआरबीच्या सर्व पोलिसांसह एकूण २२७ जण बरे झाले आहेत. दौंड शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील ७, असे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात ८ ऑगस्ट रोजी एकेरीवाडी व केडगाव येथे प्रत्येकी दोन, असे एकूण चार जणांना बाधा झाल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली. दौंड शहरातील एक महिला व एक पुरूष यांना बाधा झाल्याची माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

दौंड तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या १५९ असून त्यामध्ये दौंड शहरातील ९२ व ग्रामीण भागातील ६७ नागरिकांचा समावेश आहे. या बाधितांवर दौंड शहरातील दोन कोविड केअर सेंटर, यवत व स्वामी चिंचोली येथील कोविड केअर सेंटर आणि विविध खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर काही बाधितांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करून उपचार सुरू आहेत. दौंड उप जिल्हा रूग्णालयात तातडीने कोरोनाचे निदान करण्यासाठी १०० रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किट उपलब्ध झाले आहेत. ज्यांची कोरोना चाचणी करणे फार तातडीचे आहे, त्यांच्याकरिता हे किट वापरले जात आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT