8 years old Swanandi Tupe completes 1800 feet rappelling on Kokankada
8 years old Swanandi Tupe completes 1800 feet rappelling on Kokankada 
पुणे

वय अवघे आठ वर्ष, अन् ही रॅपलिंग करत भिडली थेट कोकणकड्याला

सागर आव्हाड

पुणे : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत आज अनेक रणरागिणी स्वच्छंद भटकंती करत विविध गडांवर, मोहिमेंत सहभागी होतात. अश्याच एका रणरागीणीने एक अदभूत व अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. 

स्वानंदी सचिन तुपे. वय अवघे आठ वर्षे आणि ही चिमुकली भिडलीये थेट कोकणकडा रॅपलिंगला. 1800 फूट उंचीच्या या सह्याद्रीतील प्रचंड रौद्र अशा कोकणकड्यावरुन ती जवळपास 45 मिनिटांत रॅपलिंग करुन खाली आली.  

लोणी काळभोर येथील कुंजीरवाडी येथे राहणारी, एम.आय.टी शाळेत चौथीत शिकत आहे. तिने आत्तापर्यंत सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा गड हा अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणारा गड तिने सर केला आहे. तिचे वडील सचिन तुपे व काका पंडित झेंडे यांच्या बरोबर तिची भटकंती सुरू असते.

आठ डिसेंबरला खीरेश्वर येथून सायंकाळी सहा वाजता तिने हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. रात्री साडेआठ वाजता ती गडावर पोहचली. तेथे रात्री चा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दहा डिसेंबरला पहाटे कोकण कड्यावर पोहचली. सकाळी आठच्या दरम्यान ती व तिचे वडील सचिन तुपे यांनी कोकणकड्या वरून रॅपलिंग करायला सुरुवात केली. 

पहिला 900 फुटांचा टप्पा पार करायला तिला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण ओव्हरहॅंग म्हणजे, लटकत खाली जाणे असा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा हा 600 फुटांचा आहे. तो तिने दहा मिनिटांत पार केला. तिसरा टप्पा 300 फुटांचा आहे. हा टप्पा सोपा आहे, हा तिने आठ मिनिटांत पार केला. 

येथून पुढे खरी कसरत चालू झाली. येथून बेलपाडापर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड आहे. वाटेमध्ये मोठी दगडांची वाट पार करून जावे लागले.वा ट अशी नाहीच, अंदाजे दगडांवर पाय ठेऊन जिथे वाट दिसेल तेथे पाय रोवून जावे लागत होते. अतिशय कष्टदायक व सत्व परीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडेपाच तासांचे पदभ्रमण करून रात्री साडेआठ वाजता ती बेलपाडा येथे पोहचली.

या मोहिमेचे आयोजन अनिल वाघ यांनी केले.त्याच्या बरोबर दीपक विशे, सिंघम व गणेश गायकवाड यांनी अनिलला साथ दिली. एकूण दहा सदस्यांनी कोकणकड्याचा 1800 फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला. पंडित झेंडे हे सुध्दा या मोहिमेत सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT