Pune News
Pune News esakal
पुणे

Pune News: विद्यार्थिनीचा अभ्यास करताना खुर्चीवरच मृत्यू; स्पर्धा परीक्षेची करत होती तयारी

सकाळ डिजिटल टीम

Pune: पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने अभ्यास करताना खुर्चीवरच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वडगावशेरी भागात घडली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हृदयविकाराचा झटका येऊन तरूणी अभ्यास करता करताच खुर्चीवरून खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय.

पुण्यातील वडगाव शेरी येथील स्टडी सेंटर या अभ्यासिकेत ही तरूणी अभ्यास करत होती. पूजा राठोड असे मृत तरूणीचे नाव आहे. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने ही २५ वर्षाची तरूणी अचानक खुर्चीवरून अभ्यास करता करता खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने स्टडी सेंटरमध्ये गोंधळ उडाला. तरूणीला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

सदर घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील बऱ्याच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तरूणीबाबत घडलेली घटनाही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. यातील फुटेजमधून तरूणीला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले.

पूजा राठोड ही तरूणी मुळची सोलापूर जिल्ह्यातील होती. बीएससी केल्यानंतर ती टीसीएस कंपनीत नोकरी करत सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. आई वडील आणि एक लहानगा भाऊ एवढ्या कुटुंबाला पूजा अचानक सोडून जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT