Abhishek Shelar From Pune Created Machine to clean Garbage Without touching 
पुणे

भन्नाट 'स्टार्टअप' प्लॅन; PM कार्यालयाने घेतली पुणेकराची दखल

शरयू काकडे

पुणे : पुण्यातील रहिवासी असलेले अभिषेक शेलार यांनी कचरा गोळा करण्याची अवघड प्रकिया सोपी करण्यासाठी मार्ग शोधला आहे. समाजासाठी उपयोगी पडेल असे काहीतरी करावी अशी त्यांची इच्छा होती. बाहेरच्या देशांमध्ये भारतीयांबाबत बोलताना रस्त्यांवरील अस्वच्छता, कचरा या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला जातो. हीच ओळख पूसन काढण्यासाठी शेलार यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी एक मशीन तयार केले आहे. (Abhishek Shelar From Pune Created Machine to clean Garbage Without touching)

28 वर्षीय अभिषेक शेलार हे हार्वर्ड आणि आयआयटी बॉम्बेच्या माजी विद्यार्थी आहेत. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध पैलू पाहाता प्रत्येक महानगरपालिका प्रशासनासाठी हा एक आव्हानात्मक मुद्दा आहे. वैयक्तिक घरगुती आणि संस्थात्मक पातळीवर कचरा वेचणारे किंवा स्वच्छ सारख्या संस्थेचे कार्यकर्ते हा कचरा गोळा करुन प्रकियेसाठी पुढे पाठवतात. पण, रस्त्यावरील प्लास्टिकपासून भाज्यांच्या सालापर्यंतंचा कचरा साफ करण्यासाठी अजूनही कोणताही सोपा उपाय नाही. तसेच असा कचरा हाताने उचलणाऱ्यांच्या आरोग्यालाही धोका असतो. आणि जर हा कचरा उचला नाही तर तो वाढत जातो व तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करतो. शिवाय परिसराचे सौंदर्यही खराब होते.

जटायू ही मशीन मानवी हस्तक्षेपाशिवाय मोठ्या प्रमाणात कचरा साफ करु शकते. हे मशीन सध्याच्या व्हॅक्यूमपेक्षा जास्त चांगले तंत्रज्ञानावर काम करते. ही मशीन इतकी हलकी आहे की, छोट्या वाहनावर बसविली सहज जाऊ शकते. ही मशीन दररोज सरासरी 2 टन कचरा गोळा करू शकते.

''पाश्चिमात्य देशात रस्त्यावरील कचरा गोळा करणाऱ्या मशीन आहेत मात्र, भारतीय रस्त्यांवर त्यांची कार्यक्षमता कमी पडते. युएसए आणि युरोपमध्ये अशा मशीन रस्त्यावरील पाला-पाचोळा गोळ्या करण्यासाठी फायदेशीर ठरतात. भारतात मात्र, या मशीनद्वारे प्लॅस्टिकपासून पेपरपर्यंत आणि पेपरपासून मेटल कॅनपर्यंत सर्व कचरा गोळा केला जावा अशी अपेक्षा असते. शिवाय धूळ हा भारतीयांसाठी खूप मोठी समस्या आहे ज्यामुळे हे काम आणखीच अवघड होते'' असे शेलार यांनी सांगितले.

भारतात सगळीकडे भेडसवणारी समस्या सोडविण्यासाठी हाताने कचरा उचलण्या शिवाय काहीच पर्याय नाही. हीच समस्या सोडविणे हे आमचे ध्येय आहे. दोन वर्षाच्या संशोधनानंतर ही मशीन तयार करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या 3 वर्षात त्यांच्या कंपनीने अशा 100 मशींनस् ची देशभरात विक्री केली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि नगरविकास मंत्रालयाने त्यांच्या या स्टार्टअपची दखल घेतली दरमहिन्याला 100 मशीन निर्माण करु शकतो. भारतातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी ही मशीन नक्कीच उपयोगी ठरु शकते असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT