About 1000 teachers from state participated in the two day workshop of the IUCAA 
पुणे

आयुकाच्या ऑनलाईन कार्यशाळेत राज्यातून 1000 शिक्षकांनी घेतला सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स (आयुका) या संशोधन संस्थेच्या वतीने नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तर, राज्यातून सुमारे एक हजार शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीत घेण्यात आली. सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाची माहिती पोहोचविण्यासाठी शिक्षकांना विविध ऍप आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही कार्यशाळा इयत्ता आठवी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, भूगोल, गणित व खगोलशास्त्र या विषयांसाठी शिक्षक विविध प्रकारचे ऍप आणि टूल्सचा वापर कश्या प्रकारे करू शकतील यावर आधारित होती. तर कार्यशाळा मराठीमध्ये ठेवण्यात आली होती तसेच ग्रामीण व शहरी भागातील शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. तसेच यामध्ये विविध तज्ज्ञांनी देखील भाग घेतला होता. 

आठ दिवसांनी दिसतात कोरोनाची लक्षणे; नव्या संशोधनातून समोर आली माहित

सध्या कोरोनामुळे शैक्षणिक धोरणात बदल झाले असून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे. अश्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच विज्ञान, गणित किंवा भूगोल विषयाशी संबंधित शंका दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येईल हे या मागचे मुख्य उद्देश होते. यासाठी आयुका मार्फ़त शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यात आला व त्यावर आधारित कोणते ऍप सोयीस्कर असतील त्याची माहिती गोळा करण्यात आली. ही माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना पोहीचविण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा आता विज्ञान शिकवणे आणखीन सोपे होईल. अशी माहिती आयुकाच्या वतीने देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT