Vehicles 
पुणे

लॉकडाउनमध्ये पुण्यात तब्बल 'एवढ्या' वाहनांची झाली विक्री; आरटीओच्या तिजोरीत कोटींची भर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाउनमधून जनजीवन आता सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयही (आरटीओ) आता सावरू लागलं आहे. नोंदणी सुरू झाल्यापासून गेल्या 45 दिवसांत सुमारे साडेसहा हजार नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. 

देशात 25 मार्चपासून लॉकडाउन लागू झाले. आरटीओ कार्यालयेही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यावर 18 मे पासून आरटीओ कार्यालयांत वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. तेव्हापासून 30 जूनपर्यंत 6 हजार 525 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यातून 30 कोटी 23 लाख रुपये आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 

गेल्या वर्षी याच काळातील वाहनांच्या नोंदणीची तुलना केली असता, 45 दिवसांतील साडेसहा हजार वाहनांची नोंदणी ही सुमारे 30 टक्के असल्याचे निरीक्षण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी नोंदविले. लॉकडाउनच्या काळातील सर्वच व्यवहार ठप्प असताना, साडेसहा हजार नवी वाहने खरेदी होत आहेत, ही समाधानकारक बाब असून वाहन उद्योगांची बाजारपेठ काही प्रमाणात का होईना सावरत असल्याचे लक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांनंतर सणांचा कालावधी सुरू झाल्यावर वाहन विक्री वाढू शकेल, असाही अंदाज त्यांनी वर्तविला. 

18 मे ते 30 जून दरम्यान नोंदणी झालेली वाहने 

- मोटारसायकल - 3956
- मोटारी - 2083 
- रिक्षा - 309
- मालवाहतूक करणारी वाहने - 108 
- इतर वाहने - 069 
- एकूण वाहने - 6525

- आरटीओच्या  तिजोरीत जमा झालेला महसूल - 30 कोटी 23 लाख 36 हजार 975 रुपये 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT