pune sakal
पुणे

मृत्युंजय दुतांकडून अपघातग्रस्तांना मिळतेय वेळेवर मदत

पुणे-नाशिक महामार्गावरील माळेगावच्या हद्दीत झालेल्या अपघातातील जखमींचे प्राण वाचवत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

जयदीप हिरवे

सातगाव पठार : आंबेगाव येथील मृत्युंजय दुतांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव ता.खेड च्या हद्दीत झालेल्या अपघातातील जखमींचे प्राण वाचवत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पेठ येथील मृत्युंजय दुतांनी पेठ परिसरात आत्तापर्यंत झालेल्या अपघातांतील बावीस जखमींचे प्राण वाचवले असल्याची माहिती आळेफाटा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी दिली. (Pune News)

दरम्यान आज दि. १४ रोजी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील धनश्री हॉटेल समोर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक यांचा अपघात झाला. सदर अपघातात ट्रक क्रमांक जि.जे.१७ झेड. ७५३६ हा खराब झाल्याने रोडचे बाजूस घेऊन काम चालू असताना कँटेनेर नंबर आर.जे.१४ जि.एल.९६६५ चा चालकाने झोपेत निष्काळजीपणे गाडी चालवून टाटा ट्रक ला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला सदर अपघात मनोज किशोर सिंग वय २५ वर्ष व गजे सव्हाण सिंग वय २८ वर्षे दोन्ही राहणार राजस्थान आणि गणपत प्रभात परमाळे वय ४० वर्ष व सलीम बाबू मिर्झा वय ३२ वर्षे दोन्ही राहणार गुजरात हे गंभीर जखमी झाले आणि ट्रकमध्ये अडकुन पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र आळेफाटा येथील पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मडके व पोलीस हवालदार योगेश गायकवाड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी मृत्युन्जय दूत यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून खाजगी रूग्णवाकिेव्दारे तृप्ती हॉस्पिटल खेड येथे उपचारासाठी दाखल केला.

आळेफाटा महामार्ग हद्दीत एकूण २७ मृत्युंजय दुत टीम स्थापन करण्यात आलेले असून सर्वांना अपर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रीतम यावलकर, सर्व उपविभागीय अधिकारी व शंकर शिंदे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सर्वांना एक स्टेचर व प्रथम उपचार किट वाटप करण्यात आलेली आहे. पेठ येथील दिलीप धुमाळ, अशोक राक्षे, तुषार तोडकर, सर्फराज तांबोळी, दिलीप पवळे या मृत्युंजय दूतांचे चांगल्या कामगिरीबद्दल नागरीकांकडून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

Louvre Museum Robbery : मोनालिसाची पेंटींग असलेल्या म्युझियममध्ये दरोडा, अवघ्या सात मिनिटांत लंपास केले ऐतिहासिक दागिने, कशी झाली चोरी?

No Kings Protest: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निषेधाची आग! नो किंग्ज आंदोलन म्हणजे नेमकं काय? लाखो लोक रस्त्यावर का उतरलेत?

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

SCROLL FOR NEXT