Student_School
Student_School 
पुणे

Right to Education : वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीतील नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित जागांवर प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा टप्पा पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर  यांनी सांगतिले. ते म्हणाले, "प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर देखील एखाद्या शाळेत २५ टक्के राखीव जागांपैकी काही जागा शिल्लक असतील, तर त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. त्याकरिता पालकांना माहिती लवकरच कळविण्यात येईल."

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत झालेले प्रवेश :

जिल्हा शाळांची संख्या २५ टक्के अंतर्गत राखीव जागा प्रतिक्षा यादीतील जागा प्रोव्हिजनल प्रवेश निश्चित झालेले प्रवेश
पुणे ९७२ १६,९५० ४,८१८ २१८४ २,६४७
नगर ३९६ ३,५४१ ८०९ ३६५ ४४४
कोल्हापूर ३४५ ३,४९१ २७० ९४ १६०
नागपूर ६८० ६,७८४ १,७८९ ८५३ ८९६
नाशिक ४४७ ५,५५७ १,३६१ ५६२ ७२५
सोलापूर ३२९ २,७६४ ४४६ २४१ २६७
ठाणे ६६९ १२,९२९ १,९७७ ५८८ ९८६

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT