School_Students 
पुणे

'आरटीई'ला बसला कोरोनाचा फटका; फक्त १४ टक्के प्रवेश झाले निश्चित!

मीनाक्षी गुरव

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला यंदा कोरोनामुळे चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळाले. महिनाभरामध्ये पहिल्या सोडतीत निवडलेल्या एक लाख ९२६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३८.८७ टक्के विद्यार्थ्यांना तात्पुरता, तर केवळ १४.२५ टक्के विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला आहे.

जुलै महिना संपत आला, तरीही २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला गती न मिळाल्याने पालक हवालदिल झाले आहेत. राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एकूण एक लाख १५ हजार ४४९ राखीव जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या सोडतीतील केवळ ३९ हजार २२७
विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, तर १४ हजार ३८६ विद्यार्थ्यांना आतापर्यंत निश्चित प्रवेश मिळालेला आहे. उर्वरित विद्यार्थी हे अद्यापही शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेशासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवेशाची नवी नियमावली आणि वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. त्यानुसार ही प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे.

"आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या पहिल्या सोडतीत मुलाचा क्रमांक लागल्याने आम्ही निर्धास्त होतो. परंतु कोरोनामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने आता काळजी वाटू लागली आहे. शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र अद्याप आमच्या मुलाचा शाळा प्रवेशही झालेला नाही, त्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना, असे प्रश्न पडत आहेत."
- एक पालक

कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा आढावा : (काही जिल्ह्यातील आकडेवारी)

जिल्हा आरटीई शाळा २५ टक्के राखीव जागा आलेले अर्ज पहिल्या सोडतीत निवडलेले अर्ज तात्पुरते प्रवेश निश्चित प्रवेश
पुणे ९७२ १६,९४९ ६२,९१९ १६,६१७ ६,९५० ७४५
नाशिक ४४७ ५,५५७ १७,६३० ५,३०७ २,४५८ १८८९
नागपूर ६८० ६,७८४ ३१,०४४ ६,६८५ ३,८७० ३५६
ठाणे ६६९ १२,९२९ २०,३४० ९,३२६ १,१११ १४
नगर ३९६ ३,५४१ ७,०६५ ३,३८२ १,८५७ १,३६८

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT