The accused re-molested the victim and tried to rape at perne phata Pune 
पुणे

'माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे' म्हणत आरोपीने पुन्हा केला अत्याचाराचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : पेरणे फाटा येथे कर्जाच्या पैशांच्या कारणातून विवाहितेवर बलात्कार व गर्भपाताच्या धक्कादायक घटनेत लोणीकंद पोलिसांकडून दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडितेच्या घरी जाऊन गुन्हा मागे घेण्यासाठी दमदाटी, विनयभंग व जिवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या घटनेत शिक्रापूर पोलिसांनी राहुल वाळके यास आज अटक केली. 

पुण्यातील चुकलेल्या उड्डाणपुलांचं करायचं काय? अजित पवार म्हणाले...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे फाटा (ता. हवेली) येथे पीडित महिलेच्या पतीने काही आर्थिक अडचणींमुळे पेरणे गावातील राहुल वाळके याच्याकडून उसने पैसे घेतले होते. या घटनेनंतर राहुल महिलेच्या घरी येऊ लागला. काही कालावधीनंतर पैसे देऊ न शकल्याने राहुलने महिलेवर दहशत निर्माण करून लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. तसेच आरोपीने यादरम्यान महिलेवर दहशत निर्माण करत पतीच्या खोट्या सह्या करून जबरदस्तीने गर्भपात केला. या अत्याचारास कंटाळून महिलेने त्याच्याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला 

आरोपी राहुलने उच्च न्यायालयाकडून या प्रकरणात जामीन मिळवला. तो जामिनावर बाहेर असताना त्याने महिलेच्या घरी जाऊन माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत महिलेस मारहाण करत पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी राहुल संजय वाळके (रा. पेरणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्काराचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अक्षता मुळे हिची निवड; पाच वर्षांनंतर मिळाला मान

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

SCROLL FOR NEXT