पुणे

किल्ले तोरणा व राजगडावर जाणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : नववर्षाच्या पुर्वसंध्येला वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तोरणा व राजगडासह तालुक्याच्या पर्यटनस्थळांवर मद्यपान व अनुचित प्रकार रोखण्यासाठी 
स्थानिक युवकांसह दुर्गप्रेमी संघटना, पोलिस हुल्लडबाजांवर कारवाई करत होते.

मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेल्हे तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे अनेकांची पावले वळतात. यामध्ये दुर्गप्रेमी, पर्यटक येत असतात तर काही हौसी व अतिउत्साही मंडळी किल्ल्यांवर जाऊन मद्यपान करुन किल्ल्यांचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करतात. यातून किल्ल्यांवर अपघात होणे, गटागटांमध्ये भांडणतंटे निर्माण होणे. असे प्रकार घडतात. 

या पार्श्वभुमीवर वेल्हे पोलिसांच्या मदतीने स्थानिक युवकांची दुर्गसंवर्धन समिती हि किल्ले राजगडपायथा भोसलेवाडी येथे येणाऱ्या पर्यटकांना विनंती करुन गडावर मांस व मद्य नेण्यास अटकाव करीत होते. यावेळी सचिन धायगावे, सागर उफाळे, योगेश रेणुसे दत्ता धरपाळे, मारुती धायगावे, नितीन वालगुडे, मकरंद शिंदे, गणेश भंडारी, संदिप कुंभार आदी उपस्थित होते.

किल्ले तोरणाच्या पायथ्याला य़ुथ होस्टेल असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चेक नाका तयार केला होता. दुर्गसंवर्धन समिती व युथ होस्टेल असोसिएशनचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबवित आहेत. तर वेल्हे तालुक्याच्या पुर्वेकडील प्रवेश असणाऱ्या आंबवणे गावच्या हद्दीमध्ये चेकनाका तयार करुन गाडी तपासणी करुन प्रवेश दिला जात होता.

यावेळी पोलिस कांतीलाल कोळपे, विशाल मोरेंसह, पथकातील पंचायत समितीचे नंदकिशोर सत्वधर, अशोक कोकरे, होमगार्ड अमित सरपाले, विलास गायकवाड, करण मिंढे, स्वप्निल शिंदे, गौरव खुटवड आदींनी कारवाईत भाग घेतला. तर पानशेत परिसराकडून येणाऱ्या मार्गावर व शासनाच्या नियमानुसार हॉटेल रिसॉर्टची पाहणी पोलिस कॉन्सेबल औंदुबर अडवाल व अभय बर्गे करत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT