pune sakl
पुणे

बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अ‍ॅक्टर-डिरेक्टर आदिनाथ कोठारे

आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला.

शब्दांकन : अरुण सुर्वे

पुणे : अभिनेता आदिनाथ कोठारेने(actor adinath kothare) आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. 2021 हे वर्ष आदिनाथसाठी करीयरच्या दृष्टीने तर अविस्मरणीयच वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला पाणी चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार(national award) मिळाला. यावर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला.

मराठी सिनेसृष्टीत गेली काही वर्ष यशस्वी करीयर करत असलेल्या आदिनाथचा 24 डिसेंबरला बॉलीवूड विश्वात डेब्यू होत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर याच्या भूमिकेत आदिनाथ आपला अभिनयाचा ठसा उमटवताना दिसेल.या सिनेमाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. आदिनाथ पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आहे, ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणतो, “मी आत्ता खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. 83 चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT