lockdown
lockdown 
पुणे

पुण्यातील या ग्रामपंचायतीने घेतलेल्या गावबंदच्या निर्णयाला प्रशासनाकडून स्थगिती   

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीने काल (ता. ७) जाहीर केलेल्या गावबंद निर्णयाला आज प्रांधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी स्थगिती दिली. तसेच, पुढील 14 दिवस बाजारपेठ सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत चालू ठेवण्यास सांगितले.  

शिक्रापुरात गेल्या साडेतीन महिन्यात १८ रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. त्यामुळे शिक्रापूर व्यापारी असोसिएशन, शिक्रापूर ग्रामपंचायत यांनी संयुक्तरित्या काल १४ दिवस संपूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबत व्यावसायिकांमधून तसेच बाजार समिती संचालक व माजी उपसरपंच आबाराजे मांढरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या. त्यानुसार प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी आज शिकापूर ग्रामपंचायतीत विशेष बैठक घेतली. 

गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, सरपंच हेमलता राऊत, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यात ग्रामपंचायतीने कुणालाही विश्वासात न घेता वरील निर्णय घेतल्याने सर्व व्यावसायिक अडचणीत आल्याचे मुद्दे पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश घारे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, दत्ता गिलबीले यांनी मांडले की,  22 मार्चपासून शिक्रापूरकर कोरोना रुग्णांमुळे हैराण आहेत. त्यातच तब्बल अठरा रुग्ण शिक्रापूर परिसरात निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे शिक्रापूरमधील व्यापार-उदीम विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर गाव बंदचा निर्णय प्रांताधिकार्‍यांनी मागे घ्यावा. 

याबाबत सर्वांचे म्हणणे ऐकून देशमुख यांनी सांगितले की, गावबंदसारखे असे कुठलेही मोठे निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ नयेत. याबद्दल जिल्हाधिकारी स्तरावर विचारणा करून निर्णय घ्यावेत. त्यानुसार आजपासून पुढील १४ दिवस शिक्रापूर (संपूर्ण बाजारपेठ) सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत चालू राहील. या दरम्यान कोरोनाच्या संदर्भात सर्व दक्षता सर्वांनी घ्याव्यात. 

या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद आदींनी उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली या वेळी शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकशेठ शहाणे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, जयश्री भुजवळ, अंजना भुजबळ, नवनाथ सासवडे, बाबा चव्हाण, मयूर करंजे, गौरव करंजे, नीलेश थोरात, संतोष भुजबळ, काका चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT