Pune_Bhaji-Mandai 
पुणे

पुणे : इकडं लॉकडाउन जाहीर झाला; तिकडं गर्दी अन् भाववाढही झाली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारपासून (ता.13) लॉकडाउन लागू होणार असल्याची घोषणा झाल्यावर भाजीपाला, फळे आदी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाल्याचे शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी दिसून आले. त्याचा फायदा घेऊन कृत्रिम दरवाढ ही झाल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्यावर विभागीय आयुक्त डॉ. दीपक मैसेकर यांनी लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला. भाजीपाला, किराणा, फळे, बेकरी प्रॉडक्ट आदींच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली. त्याचा फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ झाली होती. भाजीपाल्याच्या दरांबाबत ही हीच परिस्थिती होती. पेट्रोल पंपांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पिठाच्या गिरण्या ही गर्दीने गजबजून गेल्या होत्या. डी-मार्ट ही ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्याचे चित्र होते. वाईन शॉप पुढेही गर्दी झाली होती. 

शनिवारी घाऊक मंडई बंद असते. त्या मुळे भाजीपाला खरेदीसाठी आजच गर्दी झाल्याचे दिसत होते. अनेक गृहरचना सोसायट्यांनी सोमवारपासून घरेलू कामगारांना प्रवेश नसेल, अशा सूचनाही नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या होत्या. नुकतेच सुरू झालेले लघु आणि मध्यम उद्योग ही लॉकडाउनच्या निर्णयामुळे धास्तावले होते तर नेहमीची लागणारे औषधेही साठा करून घेण्याचे प्रमाण सायंकाळी दिसून आले. दरम्यान, लॉकडाउनच्या नेमक्या गाईडलाइन्स शनिवारी जाहीर होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे त्या कडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सर्व बाजार बंद राहणार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारीही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. अडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशमुख म्हणाले, पूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही बाजार सुरू असायचा. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. गुळ-भुसार, फळे, भाजीपाला आणि फुले विभाग बंद राहणार आहेत.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT