Crowd_In_Market 
पुणे

बाजारपेठा हाऊसफुल्ल! कोरोनाची धास्ती घेत पुणेकरांनी केली खरेदी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुण्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र शनिवारी (ता.११) दिवसभरात दिसून आले. दुकाने, भाजीचे स्टाॅल हाऊसफुल्ल दिसत असली तरी लोकांमध्ये धास्ती असल्याचेही दिसून आले.

पुण्यात रोज नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, ही संसर्गाची साखळी तुटावी म्हणून पुन्हा एकदा सोमवारी (ता.१३) मध्यरात्री १२ पासून ते २३ जुलैपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये १८ जुलैपर्यंत भाजीपाला, किराणा दुकाने बंद असणार आहेत. या काळात औषध, दूध विक्री आणि दवाखाने सुरू राहणार आहेत. याची घोषणा शुक्रवारी दुपारी झाल्यानंतर पुण्यातील सर्वच भागात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. 

लॉकडाऊन काळात नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी  दोन दिवस सामान खरेदीसाठी वेळ देण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून किराणा दुकानासमोर रांगा लागलेल्या होत्या, यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला गेला होता. किराणा दुकानांपुढे नागरिक सामान खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. वाढती गर्दी बघून अनेक दुकानदारांची चांगलीच धावपळ उडाली. काही दुकानदारांना सामानाची यादी घेऊन थोड्यावेळाने सामान घेऊन जाण्यास सांगून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. 

"लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर किराणा सामानाची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे सामान खरेदीसाठी बाहेर पडावे लागले. दुकानात मोठी गर्दी असल्याने आणि सोशल डिस्टन्सिंग राहत नसल्याने धाकधूक वाटत आहे, पण आता सामान भरणे गरजेचे आहे."
- नलिनी देशमुख, गृहिणी 

" आज सकाळपासून दुकानात गर्दी आहे, पण शिस्त पाळली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना वारंवार सूचना द्यावी लागत आहे."
- दिनेश चौधरी, दुकानदार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पेट्रोलपंपावरही रांगा
लाॅकडाऊनमध्ये पेट्रोल पंप चालू राहणार की बंद असणार यामुळे संभ्रम असल्याने पुणेकरांनी पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. 

दारूच्या दुकानांपुढे रांगा
दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी गर्दी ओसरली होती. मात्र पुन्हा १० दिवस लाॅकडाऊन जाहीर झाल्याने सकाळपासून दारूच्या दुकानांपुढे चांगलीच गर्दी होती. काही ग्राहकांनी दारुचा बाॅक्स खरेदी करून नेला. तर काहींनी पिशव्यांमध्ये नेऊन स्टाॅक करून ठेवला आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सर्वसामान्यांची चिंता वाढली! सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ; पाहा आजचा ताजा भाव

Gadchiroli News: माओवाद्यांची ४४ स्मारके जमीनदोस्त; एकाच दिवसात ८०० जवानांच्या १८ पथकांनी केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहरातही शिवजयंती सोहळ्याची खास तयारी

Shivaji Maharaj Jayanti Special: शिवजयंती निमित्त बनवा पारंपरिक 'सांजाची पोळी' , पाहा रेसिपीचा सोपा व्हिडिओ

Stock Market Today: शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! MCX आणि NSEचा सोनं-चांदीबाबत मोठा निर्णय; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT