The agitation of electrical workers against the privatization of the Central Government 
पुणे

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या विरोधात विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

पुणे : महावितरणच्या तीनही वीज कंपनीतील कायम आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात शनिवारी आंदोलन करण्यात आले. राज्यातील त्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. 

एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!​

केंद्र सरकारने वीज उद्योगाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. त्याला भारतीय मजदूर संघाचा विरोध आहे. तसेच सरकारने नवीन विद्युत कायदे लागू करण्याचा जो विचार सुरू केलेला आहे. त्या विरोधात महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले, 
देशामध्ये "एक उद्योग एक वेतन' या नीतीचा अवलंब झाला पाहिजे. देशभरातील वीज कंपन्यांमध्ये वर्षानुवर्ष लाखो वीज कंत्राटी कामगार अत्यंत तुटपुंज्या अशा किमान वेतनावर काम करत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना प्रथम वीज कंपन्यांमध्ये कायम करून घ्यावे. कामगारांना वयामध्ये सवलत आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, या भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या आहेत, आज या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले. 

Fight With Corona : प्लाझ्मा दान करून त्यांनी ५८ जणांना दिले जीवदान!

जोपर्यंत हे धोरण ठरत नाही तोपर्यंत देशभरातील कंत्राटी कामगारांचे कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आथिॅक शोषण होत आहे, त्याची चौकशी करावी. कंत्राटदार विरहित कामगार पद्धत वीज उद्योगात लागू करावी अशी मागणी यावेळी महासंघाच्या वतीने करण्यात आली. वीज कामगार महासंघाचे विजय हिंगमिरे, तुकाराम डिंबळे, मुकुंद त्र्यंबके, सचिन मेंगाळे, राहुल बोडके आणि सागर पवार यांच्यासह अनेक कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. 

ढगफुटी सदृष्य अतिवृष्टी! हवेली परिसरात पिकासह रस्तेही गेले वाहून​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT