Air_Pollution 
पुणे

एका पावसात हवेचं प्रदूषण आलं निम्म्यावर; मुंबईच्या तुलनेत पुणे ठरलं वरचढ

अक्षता पवार

पुणे : शहरात हवेतील सूक्ष्म धूलिकणांची संख्या (पीएम 10) गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी (ता.8) निम्म्याने घटलेली पाहायला मिळाली. गुरुवारी सूक्ष्म धुलिकणाचे प्रमाण 121 प्रति घनमीटर येवढे होते. तर, शुक्रवारी त्यात निम्म्याने घट होत 53 प्रति घनमीटर इतके नोंदले गेले. गुरुवारपासून (ता.7) पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता आता सुधारली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील हवेचा दर्जा हा मध्यम श्रेणीत नोंदला जात होता, तो आता समाधानकारक श्रेणीत पोचला आहे. तर, मुंबईच्या तुलनेत सध्या पुण्याच्या हवेचा दर्जा चांगला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पुढील दोन दिवस शहरातील हवेचा दर्जा समाधानकारकच राहणार असल्याचा अंदाज 'सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च' (सफर) या संकेतस्थळातर्फे वर्तविण्यात आला आहे.

'सफर' या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशातील चार राज्यांच्या हवेचा गुणवत्तेची नोंद केली जाते. त्यानुसार सध्या दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद या तीन शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण कमी झाले आहे. तसेच मंदावलेल्या वाऱ्याचा वेग त्याचबरोबर कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे प्रदूषकांचा प्रसारसुद्धा कमी झाला आहे.

वार : हवेचा दर्जा (पीएम 10, प्रमाण प्रति घनमीटरमध्ये)
सोमवार : 128
मंगळवार : 115
बुधवार : 122
गुरुवार : 121
शुक्रवार : 53

शुक्रवारी अशी नोंदली गेली हवेची गुणवत्ता (प्रमाण क्‍युबिक घनमीटरमध्ये)

शहर पीएम 10 पीएम 2.5 हवेची गुणवत्ता
पुणे 53 31 समाधानकारक
मुंबई 235 142 अतिशय खराब
दिल्ली 172 97 खराब
अहमदाबाद 142 75 मध्यम

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

PMP Route : ‘पीएमपी’चे मार्ग, फेऱ्या वाढणार; मार्गांची पुनर्रचना लवकरच

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कायम, तुमच्या जिल्ह्यात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीकविमा; उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर; शेतकऱ्यांना २१०० कोटी मिळण्याची आशा

SCROLL FOR NEXT