This is the airfare from Pune for 8 cities like Delhi, Bangalore, Ahmedabad, Chennai
This is the airfare from Pune for 8 cities like Delhi, Bangalore, Ahmedabad, Chennai 
पुणे

दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईसह ८ शहरांसाठी पुण्याहून 'असे' आहे एअर फेअर

सकाळवृत्तसेवा

पुणे : दिल्लीसाठी 6 ते 8 हजार, कोचीनसाठी 8 ते 9 हजार रुपये, जयपूरसाठी 7 हजार, बंगळूरूसाठी 5 हजार रुपये...हे आहेत सोमवारी सुरू झालेल्या विमान सेवेचे पुण्यापासूनचे प्रवासभाडे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी-जास्त होत असल्यामुळे प्रवासीभाड्याचे हेलकावे दिवसभर होत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे 25 मार्चपासून देशातील विमान वाहतूक बंद होती. मात्र, देशातंर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 22 मे रोजी घेतला. त्यानुसार विमान कंपन्यांनी 23 मे पासून बुकींग सुरू केले. पण महाराष्ट्र सरकारने सुरवातीला देशातंर्गत विमान वाहतूक सुरू करण्यास 24 मे रोजी नकार दिला. त्यावर दिवसभर चर्चा होत राहिली आणि त्याच दिवशी रात्री राज्य सरकारने विमान वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक सुरू होणार का, या बाबत अनिश्चितता होती. मात्र, काही विमान कंपन्यांनी खुले केलेले आरक्षण पुन्हा बंद केले होते. त्यामुळे दरांबाबतही अनिश्चितता होती. 24 मे रोजी रात्री उशीरा अखेर विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे लक्षात आल्यावर विमानकंपन्यांनी त्यांचे दर वाढवून निश्चित केले. दिल्लीसाठी सुरवातीला 8 हजार रुपयांनी सुरवात करण्यात आली. परंतु, ते दर 6 ते 8 हजार रुपयांपर्यंत मर्यादीत राहिले. विमान कंपन्यांचे दर मागणी- पुरवठा तत्त्वानुसार निश्चित होतात. परंतु, अनिश्चिततेमुळे दरांचेही हेलकावे कायम राहिल्याचे पहिल्या दिवसाच्या बुकींगवरून दिसून आले.

वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव
--------
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत
--------
कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर

पुण्यावरून दिल्लीसाठी 6 ते 8 हजार, बंगळुरूसाठी 3800 ते 5296, कोचीनसाठी 8 ते 9231, जयपूरसाठी 6953, अहमदाबादसाठी 4200, हैदराबादसाठी 5800 ते 8220, चेन्नईसाठी 4700 ते 7521, रुपये हा प्रवास भाड्याचा दर असल्याचे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिसून आले. अर्थात विमान वाहतूक सुरू झाल्यावर मागणी वाढून दर पुन्हा कमी-जास्त होऊ शकतात, असे एका विमान वाहतूक कंपनीच्या प्रतिनिधीने सकाळशी बोलताना सांगितले. दरम्यान गरज असेल तरच विमान प्रवास करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडकलेले प्रवासीच प्रवास करतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुण्यावरून दिल्ली, चेन्नई, कोचीन, हैदराबाद, कोलकत्ता, बंगळुरू, जयपूर, अहमदाबाद या शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे.  

पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ

या बाबत ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे (टॅप) संचालक निलेश भन्साळी म्हणाले, देशातंर्गत विमान वाहतूक सुरू झाली, ही स्वागतहार्य बाब आहे. विमान कंपन्यांनी या बाबत तिकिटांचे बुकींग करणाऱया कंपन्यांना पूर्वकल्पना दिली असती,  तर आणखी तयारी करता आली असती. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्या या
दोन्ही घटकांचा फायदा झाला असता. येत्या दोन दिवसांत विमान वाहतूक सेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांची पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे. कारण आमचे नुकसान झालेले असले तरी, प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT