Ajit-Pawar 
पुणे

विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार...

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - विमानतळासाठी या वर्षी ५०० कोटी रुपये देणार आहे. विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार ते सांगणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन विमानतळाबाबतचे गूढ बुधवारी वाढविले. पुण्याभोवती पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत दोन रिंगरोड करणार आहे. चाकण व राजगुरुनगरची वाहतूक कोंडी सोडविण्याच्या कामाला गती दिली आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी, दिलीप मोहिते यांची तिसऱ्यांदा आमदारपदी आणि निर्मला पानसरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे शेतकरी मेळावा आणि जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शिवरायांच्या शिकवणुकीवर महाविकास आघाडीची वाटचाल होत राहणार आहे. महात्मा फुले कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. विमानतळासाठी जमीन संपादन करताना रेडी रेकनरच्या चौपट नुकसानभरपाई देणार आहोत.’’

दादागिरी केल्यास मोका
कारखान्याचा मालकही टिकला पाहिजे आणि कामगारही जगला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कामगारांची पिळवणूक करता काम नये, तसेच उद्योगपती बाहेर जाऊन चालणार नाही. जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण असले पाहिजे. कारखानदारांनी दादागिरी केली किंवा दहशत दाखविली तर कोणीही असला तरी मी हयगय करणार नाही. संबंधिताला मोका लावणार, असा इशाराही पवार यांनी दिला. 

संत तुकाराम कारखानावाले खेड तालुक्‍याला सवतीच्या पोरासारखे वागवतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नाना नवलेंनी वेगवेगळ्या पक्षांतून स्वतःचेच नातेवाईक घुसविले, त्यामुळे या वर्षी आम्ही कारखान्याला ऊस घालणार नाही, असा इशारा मोहितेंनी या वेळी दिला.

पंचायत समितीची इमारत त्याच आवारात व्हावी, एवढेच माझे म्हणणे आहे, त्यासाठी माजी आमदारांनी आंदोलनाची गरज नव्हती; पण शिवसेनेला जुन्या सवयी मोडवत नाहीत. स्टंटबाजी करायची आणि दाखवायचं की आम्हाला किती काळजी आहे. सेनेचाच मुख्यमंत्री आहे, हे त्यांना माहीत आहे की माहीत नाही? राजकारण गढूळ करू नये अशी माझी सेनेला विनंती आहे, असे या वेळी बोलताना मोहिते म्हणाले. 

प्रास्ताविक कैलास सांडभोर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले. बाजार समितीचे सभापती बाळ ठाकूर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : ग्रामसेवकांच्या गैरहजेरीला आता लगाम! बायोमेट्रिकसह GPS हजेरी बंधनकारक, नियम मोडल्यास होणार कारवाई

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप! नेहा पिसाळ राज्य कर निरीक्षकपदी, जिद्दीला मिळाली यशाची पावती..

SCROLL FOR NEXT