पुणे - शहरात मेट्रो कधी धावणार... पुरंदर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण कधी होणार... रिंग रोड, चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार... भामा आसखेड धरणातून शहरवासीयांना पाणी कधी मिळणार... शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले मोठे प्रकल्प नेमके कधी मार्गी लागणार, असे प्रश्न पुणेकरांच्या मनात सतत घोळत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या विकासकामांना ब्रेक लागला होता. परंतु ही विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वॉर रूम सुरू केली आहे. आठवड्यातून दोनदा उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुंबईतून विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचेच झाले आहे. आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते नसल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रिंग रोडच्या कामासाठी भूसंपादनाचे काम संथपणे सुरू आहे. पेठांसारख्या मध्यवर्ती भागापासून शहरालगतच्या विकसित होणाऱ्या गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. पुरंदर विमानतळासह विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाचे काम गतीने होणे अपेक्षित आहे. ही सर्व कामे गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉर रूममधून असे चालणार काम
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून ही वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. या वॉर रूममधून दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी जिल्ह्यातील मोठ्या विकासकामांच्या प्रकल्पांवर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री पवार हे मुंबईतून स्वत: आठवड्यातून दोनदा विकासकामे कोठपर्यंत आली, याचा आढावा घेणार आहेत.
कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणा आरोग्यविषयक उपाययोजना करण्यात व्यग्र होती, त्यामुळे मोठ्या प्रकल्पांच्या विकासकामांवर काही परिणाम झाला. परंतु महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित इतर प्रश्न मार्गी लावण्यात येतील. वॉर रूमसाठी काही प्रमुख अधिकाऱ्यांचा विशेष सेल तयार केला आहे. आढावा बैठकीपूर्वी संबंधित प्रकल्प प्रमुखांना त्याची तयारी करावी लागणार आहे.
- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.