Alandi Devasthan made a big decision in the matter of worship 
पुणे

आळंदी देवस्थानने घेतला महापूजेच्या बाबतीत मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवरील भाविकांच्या वतीने होणा-या महापूजा बंद करून मुख्य गाभा-याच्या बाजूला मुक्ताबाई मंडपात कार्तिकी वारीप्रमाणे माउलींच्या चांदीच्या चलपादूका मांडून त्यावर महापूजा करण्याचा निर्णय आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

समाधीची होणारी झिज आणि दर्शनाच्या रांगेतील भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी हा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारी (ता.२७) पासून होणार असल्याची माहिती आज आळंदीत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांनी सांगितली.

पुणे : मिलिटरी इंजिनिअरिंगध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू; ०९ जखमी

याबाबत आळंदी देवस्थानमधे सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी विश्वस्त डॉ.अभय टिळक आणि डॉ.अजित कुलकर्णी उपस्थित होते. देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या सहमतीने निर्णय झाला आहे. आळंदी देवस्थानमध्ये माउलींच्या समाधीवरील पहाटेच्या पवमान अभिषेकानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत चालणा-या महापुजा अनेक वर्षे सुरू असल्याने समाधीची झिज होत होती. समाधीची झिज बंद व्हावी आणि दर्शनाच्या रांगेतील भाविकांच्या दर्शनाची गैरसोय होवू नये यासाठी देवस्थानच्या विश्वस्त समितीने गेली काही महिने पुजेबाबत पाहणी केली. 

FlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण

मंदिरातील सीसीटीव्ही तपासले. याबाबत धर्मदाय आयुक्तांनीही यापूर्वीच देवस्थानला महापुजेच होणा-या गैरसोयीबाबत आणि गर्दीचे नियोजन करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यास कळविले. महिन्यापूर्वी पुरातत्व विभागाने पाहणी करून पिठी साखर आणि दुधासारख्या द्रव्यामुळे समाधीच्या होत असलेल्या झिजेबाबत स्पष्ट अहवालही दिला होता. याबाबत देवस्थानच्या पुजारी, मानकरी आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख घटकांबरोबरच अन्य देवस्थानमधे कशा पद्धतीने पुजा केल्या जातात याचीही चर्चा व माहिती घेवून देवस्थानने समाधीचे आणि परंपरांचे हित जोपासण्यासाठी निर्णय घेतला आहे. 

सेट परिक्षेच्या तारखेत बदल; जाणून घ्या नवीन तारीख

पुजांच्या संख्यांचा अतिरेक आणि समाधीचे पावित्र्य राखणे याचा संबंध आल्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार केला. याचबरोबर मंदिरातील गर्दीचे व्यवस्थापन हाही हेतू आहे. यामुळे आता समाधीवरील पुजाऐवजी स्वरूप बदलून कार्तीकी यात्रेप्रमाणे चांदीच्या चलपादुकांवर केली जाणार आहे. चलपादुका मुक्ताबाई मंडपात मांडल्या जातील. भाविकांनी गैरसोय करू नये असे आवाहन देवस्थानने केले. यावर, अन्य काही सूचना करावयाची असल्यास संबंधितांनी येत्या महिन्याभरात ३१ जानेवारीपर्यंत सुचना मांडण्याची विनंती देवस्थानने केली. 

अभिमानास्पद ! पुण्यातील पोलिसाची लेक झाली न्यायाधीश

देवस्थानच्या निर्णयामुळे पुजारी वर्गाची नाराजी असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.मात्र पुजा-यांच्या चरितार्थाचा प्रश्न असल्याने आणि काही भाविकांची श्रद्धा असल्याने महापुजा बंद करण्याऐवजी त्याचे स्वरूप बदलले. माउलींची समाधीचे जतनही महत्वाचे आहे.दर्शनाच्या रांगेतील भाविकांसाठी समाधी दर्शन महत्वाचे असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. अभय टिळक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT