Indapur News Esakal
पुणे

Indapur News: इंदापूरमधील विहिर दुर्घटनेतील चारही मृतेदह सापडले; तब्बल ६८ तासांनी शोधकार्य संपलं, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

इंदापूरमधील विहिर दुर्घटनेतील मृतेदह सापडले

अंकिता खाणे (Ankita Khane)

Indapur Accident : इंदापूरमधून मोठी अपडेट समोर आली आहे. म्हसोबावाडी येथे मातीच्या ढिगा-याखाली विहिरीत गाडले गेलेल्या चार मजूरांपैकी शेवटचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता. त्यानंतर दीड तासाने दुसऱ्या दोन मजुरांचा मृतदेह सापडला.

त्यानंतर तासाभराच्या अंतराने शेवटच्या मजूराचा मृतदेह सापडला आहे. सर्व मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मंगळवारी दुपारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे एका खाणीत विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर आल्याने चार जण विहिरीत अडकले होते. हे सर्व कामगार इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावचे आहेत.

मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून या ठिकाणी त्यांचा शोध सुरु होता. आज चौथ्या दिवशी दुपारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

तब्बल ६८ ते ७० तासांच्या अथक प्रयत्नांतर चारही मृतदेह सापडले आहेत. म्हसोबाची वाडी (ता.इंदापूर) येथे ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकले होते.

बचावासाठी पोकलेन मशिनच्या साह्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. ते अखेी पुर्ण झालं आहे. यामध्ये चारही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

विहिरीची रिंग मारण्यासाठी सोमनाथ लक्ष्मण गायकवाड वय 32 वर्ष, जावेद अकबर मुलानी वय 30 वर्ष, परशुराम बन्सीलाल चव्हाण वय 30 वर्ष आणि मनोज मारुती चव्हाण वय 40 वर्ष हे चार जण विहीरात उतरले होते. अचानक रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. त्या ढिगार्‍याखाली हे चारही जण दबले गेले होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत

विहिरीमध्ये काम करणारे सर्वजण मजूर असून त्यांच्या कुंटूबाचा मजूरीवरतीच उदरनिर्वाह चालतो. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आज पावसाळी अधिवेशानामध्ये इंदापूर तालुक्यातील दुर्घटनेची माहिती देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्येक कुंटूबाला शासनाने मदत करण्याची मागणी केली होती.

यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृत्यू झालेल्या कुंटूबाला प्रत्येक ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या तत्परतेमुळे चारही कुंटूबाला शासनाकडून प्रत्येक ५ लाख रुपये मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT