Khadakwasla_Dam
Khadakwasla_Dam 
पुणे

पुणे : ऑक्टोबरअखेर चारही धरणं फुल्ल; यंदा शेती आणि पिण्याच्या पाण्याचं टेन्शन नाही

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत 12.60 टीएमसी पाणी सोडले आहे. तरी देखील पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणं 100 टक्के भरलेली आहेत. परिणामी वर्षभरचा शेती आणि पिण्यासाठी लागणारा मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे. 

यंदा चार ही धरणात 29.15 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी तो 28.32 टीएमसी म्हणजे 97.15 टक्के होता. म्हणजे एक एक टीएमसीने कमी आहे. 2018मध्ये सुमारे 24.80 टीएमसी म्हणजे 85.07 टक्के पाणीसाठा होता. दोन वर्षापूर्वी पेक्षा यंदा 4.35 टीएमसी पाणीसाठा जास्त जमा आहे. असे असले तरी 2019मध्ये खडकवासला धरणातून 43.65 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले होते. 2018मध्ये 20.89 तर 2017मध्ये 8.06टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले होते. वरसगाव धरण 100 भरते त्यावेळी 12.82 टीएमसी जमा झालेले असते. तेवढेच म्हणजे 12.60 टीएमसी पाणी यंदा खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडले आहे. 

वर्षभराच्या पाण्याचे नियोजन
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 29.15 टीएमसी पाणी जमा होते. राज्य सरकारने पुणे महापालिकेला उपलब्ध लोकसंख्येनुसार सुमारे साडे अकरा टीएमसी पाणी खडकवासला धरणातून घेण्याची मान्यता दिली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून महापालिका धरणातून सुमारे 18 टीएमसी पाणी घेत आहे. त्यानुसार, उरलेल्या 11.15 टीएमसी पाण्यात शेतीचे चार आवर्तन दिली जातात. यामध्ये, चार ही धरण कालव्यातील सुमारे दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. त्यातून उरलेल्या पाण्याचे शेतीसाठी नियोजन केले जात असते. त्यामध्ये, रब्बी व उन्हाळी अशी चार आवर्तने असतात. यामध्ये, तीन ते साडेचार टीएमसी पर्यंतची आवर्तन असतात. शेतीसाठी गरज भासल्यास पालिकेने वापरलेले पाण्याचा पुनर्वापर केला जातो हे साधारणपणे दोन ते तीन टीएमसी पाणी घेतले जाते. दरम्यान, हे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याचे नियोजन केले जाते. 

यंदा कमतरता भासणार नाही
यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि लाभ क्षेत्रात देखील पाऊस चांगला झाला आहे. तसेच 31 ऑक्टोबर अखेर धरणात 100 टक्के पाणी आहे. यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराला पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन उर्वरित पाणी शेतीसाठी दिले जाते. हे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ते चार आवर्तनांतून देऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका असेल.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT