An inscription found at Junnar Naneghat referring to Maharashtra as two thousand years old Sidharth Kasabe
पुणे

2 हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र; नाणेघाटातील शिलालेखात 'महारठी' उल्लेख

सिद्धार्थ कसबे

पुणे : महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश हा सातवाहन असून त्यांनी महाराष्ट्रावर सुमारे साडेचारशे वर्षे राज्य केले होते. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजांमधील सर्वात पराक्रमी राजा असुन त्याने क्षहरात राजा नहपानाचा पराभव केला होता. सातकर्णीचा विवाह हा नागणिकेसोबत झाला. जुन्नर सातवाहनांची आर्थिक राजधानी होती.

सातवाहन सम्राज्ञी असलेल्या राणी नागणिकेने जुन्नरच्या नाणेघाटातील लेणीत बाविशे वर्षांपुर्वी एक भव्य शिलालेख कोरलेला आहे.हि लेणी त्यावेळेच्या कल्याण ते पैठण या व्यापारिमार्गावर कोरलेली आहे.या लेणीत सातवाहन कुलातील राजा,राणी तसेच राजकुमार यांचे पुतळेही तिने कोरवुन घेतले होते आज त्या पुतळ्यांचे फक्त पायांचे अवशेष शिल्लक आहेत तसेच त्यांच्या वर नावे सुद्धा कोरलेली आहेत. त्यातुन ते पुतळे कोणाचे होते हे आपल्याला समजते. त्यात पहिला पुतळा हा सातवाहनांचा मुळ पुरुष राजा सीमुक सातवाहनांचा असुन त्यानंतर राजा सातकर्णी,राणी नागणिका तसेच तिचे वडील महारठी त्रयनकोर, हकुसिरी, भायल व सातवाहन यांचे आहेत.

An inscription found at Junnar Naneghat referring to Maharashtra as two thousand years old

राणी नागणिकेने लेणीच्या समोरील दोन भिंतींवर शिलालेख कोरलेले आहेत हि लेणी एक ऐहिक लेणी असुन तिचा कोणत्याही धर्माशी संबंध नाहीये. सातवाहन राजांनी अनेक बौद्ध लेण्या कोरण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख आपल्याला लेण्यांवरील शिलालेखात मिळतात.

नाणेघाट लेणीत राणी नागणिकेने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले होते तसेच गावांना अनेक दान दिले होते त्याचा उल्लेख या शिलालेखात केला गेला आहे. त्यात २०,००० कार्षापन नाणी हत्ती, शेकडो गाई, बैल, घोडे आदी गावांना दान दिल्याचे उल्लेख आहेत. ज्येष्ठ पुरातत्व अभ्यासक डॉ.शोभला गोखले मॅडम यांनी या शिलालेखाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.

महारठी म्हणजेच महाराष्ट्र असा उल्लेख असलेला शब्द.

अंदाजे २२२७ वर्षांपूर्वी राणी नागणिकेने नाणेघाटची निर्मिती केली. या शिलालेखात आपल्याला महारठीनो हा शब्द वाचायला मिळतो ते वाक्य पुढील प्रमाणे..

महारठीनो अंगीय कुल वधनस सगरगिरीवलयाय पथविय पथम विरस वस य महतो मह

अर्थ - महारठी अंगीय कुलातील गिरीसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील विरश्रेष्ठ असा पुरुष.

गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असुन नाणेघाटातील हाच दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा त्यासाठी ग्राह्य धरला जात आहे. यात महारठ्ठी भाषा बोलणारे लोक व ते ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश म्हणजेच महारठी प्रदेश म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय. त्याच प्रमाणे सातवाहन कुलातील राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथासप्तशती हा ग्रंथ लिहला असुन हा ग्रंथ महाराष्ट्राचा आद्य ग्रंथ मानला जातो व त्यावेळच्या महाराष्ट्राचे जनजीवन तसेच विविध रूपे आपल्याला या काव्य ग्रंथात आपणास वाचायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT