पुणे

Pune : आंबेडकरी जनता समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी - आनंदराज आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळण्यासाठी अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यांना बळ देण्यासाठी आंबेडकरी जनता, रिपब्लिकन सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय विभागाने बहुजनांच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवावेत. योजना लोकाभिमुख कराव्यात. तसेच, कोणत्याही अडचणी आल्यास सर्व आंबेडकरी जनता, रिपब्लिकन सेना तुमच्या सोबत ताकदीनिशी सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. काही ठराविक संघटनांकडून आंदोलन करुन विभागाच्या अधिकाऱ्यांची बदनामी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आंबेडकर यांच्या वक्तव्याचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

काही राजकीय पदाधिकारी नको ती कामे करण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोचण्यास अडचण निर्माण होत असल्याची भावना अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांच्या वक्तव्याचे सामाजिक न्याय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT