Crime-Story-Pune 
पुणे

पुणे : भांडणं दहीहंडीवेळची अन् त्या चौघांनी आता राग काढला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहीहंडी उत्सवात झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर चौघांनी एका तरुणास निर्जनस्थळी नेऊन त्यास पट्ट्याने आणि बांबूने जबर मारहाण केली. ही घटना वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानाजवळच्या परिसरात बुधवारी (ता.6) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

उमेश संदिप भुतकर (वय 19, रा. निवृत्तीनगर, चरवडवाडी, वडगाव बुद्रुक) आणि लखन बालाजी कांबळे (वय 24, रा. साईधाम, हॅपी कॉलनी, नऱ्हे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. तर अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने सिहंग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची दहीहंडी उत्सवाच्यावेळी किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. दरम्यान, फिर्यादी हे बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन वडगाव बुद्रुक येथून जात होते. त्यावेळी भुतकर, कांबळे आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीस अडविले. दहीहंडीच्यावेळी तुला खूप माज आला होता का? असे धमकावित त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून चरवड वस्ती येथील घोड्याच्या तबेल्याच्या पाठीमागे असणाऱ्या शिंदे मैदानाजवळ घेऊन गेले. त्यानंतर तेथे फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर, डोक्‍यावर व तोंडावर पट्ट्याने व बांबुने जबर मारहाण केली. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोघेजण फरारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT