मंचर - पुणे जिल्ह्यातील १० लाख बैल, गाई, म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. जनावरांना १२ अंकी आधार कार्ड मिळणार आहे. जिल्ह्यात हे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे भविष्यात माणसांच्या आधार कार्डसारखी जनवारांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. तसेच, जनावरांनाही स्वतःची ओळख मिळणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाय, म्हैस, बैल यांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम सुरु आहे. आधार कार्डवर त्यांची नोंद इनाफ प्रणालीवर केली जाणार असून, जनावरांची परिपूर्ण माहिती इंटरनेटवर ऑनलाइन पाहण्यास मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत ५५ हजार जनावरांना लसीकरण व बिल्ले मारून आधार कार्ड तयार होण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी सांगितले की, जनावरांचे वय, वर्ण, जात, शिंगे, शेपूट, लसीकरण, रेतन, कधी व्याली, काय जन्मले, गाभण, पूर्वीचे आजार यांची नोंद केली जात आहे. अशी परिपूर्ण माहिती जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या कारणांसाठी नोंदणी बंधनकारक
संक्रमक व संसर्गजन्य रोगांचे (लाळ खुरकूत) रोगप्रतिबंधक लसीकरण करणे पशुपालकांना बंधनकारक आहे. याबाबतचे कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणे किंवा उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीस एक हजार रुपयांपर्यंत दंड व दंड न भरल्यास एक महिन्यापर्यंत कारावास, अशी शिक्षा तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
- डॉ. शिवाजीराव विधाटे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात ३० पशू वैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टर व कर्मचारी, असे १०० जण काम करत आहेत. अजून ४५ हजार जनावरांचे बिल्ले मारण्याचे काम पूर्ण करावयाचे आहे.
- डॉ. अतुल चिखले, तालुका पशुधन विकास अधिकारी, आंबेगाव
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.