corona 
पुणे

पुणेकरांच्या जावई पाहुणचाराने नारायणगावकरांना अजीर्ण

रवींद्र पाटे

  
नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्याताल नारायणगाव येथील महिला व फोटोग्राफर तरुणाला कोरोनाचा संसर्ग  झाल्याचे तपासणी अहवालावरून आज स्पष्ट झाले. त्यामुळे मागील चार महिने कोरोनामुक्त असलेल्या नारायणगाव शहरात मागील तीन दिवसांत कोरोना रूग्णांची एकूण संख्या तीन झाली असून, तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या ऐंशी झाली आहे, अशी माहिती  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

जुन्नर तालुक्यातील बावीस गावात कोरोनाचा शिरकाव झाला असताना लोकसंख्या जास्त असलेली तालुक्यातील वारुळवाडी व नारायणगाव ही दोन गावे मागील चार महिने कोरोनामुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायत, आरोग्य व पोलिस प्रशासनाला यश आले होते. येथील ग्रामस्थ व प्रशासनाचे तालुक्यात कौतुक होत असतानाच २८ जुन रोजी वारुळवाडी येथील उपबजारातील लेखनीकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर १ जून रोजी नारायणगाव येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. हा तरूण काही दिवसांपूर्वी कसबा पेठ (पुणे) येथे सासुरवाडीला गेला होता. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या फोटोग्राफरचा (वय १८) व अकोला येथून आलेल्या एका महिलेचा (वय ४५) कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नारायणगाव शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. 

फोटोग्राफर तरुण व महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून ग्रामस्थ व व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन सरपंच योगेश पाटे व उपसरपंच सचिन वारुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar PAN Link : मोठी बातमी ! 'या' लोकांचे आधार अन् पॅन कार्ड १ जानेवारी पासून डिअ‍ॅक्टिवेट होणार, आजच करा 'हे' काम

Malshiras Crime : पहिल्या प्रियकराने काढला प्रेयसीच्या पतीचा काटा; राजेवाडीत तरुणाचा कोयत्याने वार करून खून

Mumbai : निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का, तेजस्वी घोसाळकर भाजप प्रवेश करणार

Maharashtra Cold Wave : राज्यात पारा घसरला, तापमान ६ अंशावर; पुढील दोन दिवसांत हवामानात होणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

SCROLL FOR NEXT