corona  
पुणे

पुरंदरमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : मुंबई येथून गुऱ्होळी (ता. पुरंदर) येथे आलेला एक 60 वर्षीय व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह निघालाच. पण, त्याच्यामुळे गावाकडील त्याची 82 वर्षांची आई बाधीत झाली व आज दुपारी तिचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला व पाठोपाठ सायंकाळी तिच्या मृत्यूचीही बातमी आली. त्याशिवाय घरातील आणखी एक व्यक्तीही पाॅझिटिव्ह असून, मूळ रुग्णासह दोघे रुग्णालयात उपचारार्थ आहेत.

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 12 रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहाजण बरे होऊन आले व रुग्णालयात चारजण आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी दिली. 

मुंबईवरून गावाकडे फार न येणारा 60 वर्षीय गृहस्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी गावाकडे गुरोळीला 2 मे रोजी आला होता. सुरवातीला तो व्यवस्थित होता. मात्र, 6 रोजी पासून त्याला कोरोनाची लक्षणे दिसून त्रास सुरु झाला. त्यानंतर त्याला सासवड कोवीड केअर सेंटरला आणून स्वॅब तपासणीस पाठविण्यात आला. 8 मे रोजी तो कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे रिपोर्टवरुन निष्पन्न झाले. त्यांना उपचारार्थ पाठविण्यात आले. मात्र, कोविड केअर सेंटरला सासवडला असलेल्या दोघांना त्रास वाटल्याने नमुने घेतले. तोपर्यंत उपचार सुरु असतानाच सरकारी रुग्णालयात आईचा कोरोनाने मृत्यू झाला, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण 12 असून, त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आज रुग्णालयात एकूण 4 रुग्ण उपचारार्थ आहेत, 6 उपचार घेऊन परत आले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त पुरंदर होणे आणखी दूर गेले आहे. एकुणच पुरंदरची डोकेदुखी कमी होत नाही. 

पुरंदर तालुक्यातील 12 पैकी 11 रुग्ण मुंबई व पुणे कनेक्शनमधून पुढे आले आहेत. एकूणच मुंबई व पुणे कनेक्शनमधून धाकधूक सतावतेय. अजूनही मुंबईहून गावाकडे व पुण्यातून नित्य ये जा करणारे भरपूर आहेत. त्यांनी घरीच क्वारंटाइन राहिले तरच या संसर्ग वाढीवर नियंत्रण मिळू शकेल. गावोगावी त्यासाठीच बारकाईने काळजी न घेतल्यास मोठा धोका उंबरठ्यावर आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT