ayush prasad 
पुणे

पैसै उकळणाऱ्या हाॅस्पीटलच्या तक्रारी करण्याचे आवाहन

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : जी खासगी रुग्णालये कोरोना रूग्णांकडून अवाजवी पैसै उकळत आहेत, त्या रूग्णालयांविरूद्ध संबंधित रूग्णांनी तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच, रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. 

खेड पंचायत समितीच्या सभागृहात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयुष प्रसाद बोलत होते. या वेळी सभापती अंकुश राक्षे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे उपस्थित होते.

आयुष प्रसादर म्हणाले की, गरज नसताना तपासणीसाठी लोकांचे स्वॅब घेण्यात येऊ नयेत. त्यामुळे खरे कोरोनाबधित तपासणीपासून वंचित राहतात व दरम्यान कोरोनाचा प्रसार होतो. कधी कधी रुग्णाला गरज नसतानाही ऑक्सिजन दिला जातो, त्यामुळे खरा गरजू रुग्ण ऑक्सिजन बेडपासून वंचित राहतो. प्रत्येक रुग्णालयाने आपल्याकडे उपलब्ध असलेले बेड आणि इतर माहिती फलकावर लावणे आवश्यक आहे. सरकारला सहकार्य न करणाऱ्या रूग्णालयाचा परवाना रद्द होऊ शकतो. खेड तालुक्यासाठी २२ रुग्णवाहिका शासनातर्फे कार्यरत असून, त्यांची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. तसेच, सक्षम ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका खरेदी करण्याची परवानगी जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे, असा कोणीही महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये समाविष्ट होऊन शंभर टक्के मोफत उपचार घेऊ शकतो.

कंपन्या सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील तर त्यांच्यावर महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सर्व व्यवस्था आणि नियोजन तयार आहे, फक्त अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' शोधून, त्यांना क्वारंटाइन करा. तसेच, कुठल्याही कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला घरी पाठवू नका, असे आदेश प्रसाद यांनी दिले.  

आकडा तेराशेच्या घरात
खेड तालुक्यात आज ७८ कोरोनाबधित आढळले असून, रुग्णसंख्या १२९९ झाली आहे, तर मृतांची संख्या २५ झाली आहे. चाकण येथील ४८ वर्ष वयाच्या प्रौढाचा मृत्यू झाला. चाकणला कालपासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून दिवसभरात तब्बल २७ रुग्ण सापडले. तर, आळंदीत ८ आणि राजगुरूनगरला ६ रूग्णांची भर पडली. तालुक्याच्या ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडले. राक्षेवाडीत ५, रासे येथे ४, शेलगावात ४,  खराबवाडीला ३, कान्हेवाडीत ३, भोसे येथे ३, नाणेकरवाडीला २ आणि शेलपिपंळगावात २ रूग्ण सापडले. निघोजे, भांबोली, ढोरे-भांबुरवाडी, कोये, सातकरस्थळ, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, सायगाव, रानमळा, काळूस आणि वाकी बुद्रुक येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Gold Rate: पैसे तयार ठेवा! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT