Arrested one for financial fraud with wealthy women and young women in IT by using dating app and Social media 
पुणे

डेटिंग साईटवर 'त्याची' चार अकाउंट्स; आयटीतील तरुणींना 'तो' ओढायचा जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : डेटिंग साईटसह सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रीमंत महिला व आयटीतील तरुणीना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांना लग्नाचे आमिष दाखवुन त्यांची फसवणुक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बेडया ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडुन 98 लाखाची रोकड, एक कार असा एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला. संबंधित आरोपीनेच बिबवेवाडी येथील श्रीमंत महिलेस फुस लावुन पावणे दोन कोटी रूपयांचा ऐवज लूटला होता.


अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३१ रा. श्रीकृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील एका श्रीमंत कुटुंबातील महिलेस फुस लावुन एकाने पावणे दोन कोटी रूपये लंपास केले होते. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांसमवेत गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे  पथक समांतर तपास करीत होते.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेस फुस लावणाऱ्या तरुणाचा तो वापर करत असलेल्या सोशल मीडिया साईट्स, डेटिंग साईट याची पडताळणी केली. त्यावेळी संबंधित आरोपीच्या एका जुन्या मैत्रिणीचा पोलिसांनी शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन आरोपीशी संपर्क साधला. त्यानुसार तरुणीने त्यास शनिवारी दुपारी बाणेर भागात भेटण्यास बोलाविले. त्यावेळी आगोदरच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्यास अटक केली.गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक संतोष तासगवकर, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, कर्मचारी प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रवीण शिंदे , राजेश रनसिंग आदींच्या पथकाने त्याला अटक केली.पोलिसानी अनिकेतची सखोल चौकशी केली.त्यावेळी त्याने  बिबवेवाडी येथील श्रीमंत कुटुंबातील महिलेच्या घरातून पावणे दोन कोटींचा ऐवज चोरुन नेल्याची कबूली दिली.

पुण्यात कोरोनाच्या अहवालांमध्ये सावळा गोंधळ 

अशा पद्धतीने तो महिला, तरुणीना जाळ्यात ओढत असे 

डेंटिग साईटवर अनिकेतचे ४ खाते 
अनिकेत हा उच्चशिक्षित आहे.त्याने एमसीए पूर्ण केलेले आहे. तसेच त्याचे स्वतःचे रेस्टॉरंटही आहे. त्याने डेंटिग संकेतस्थळावर विविध नावाने चार खोटे प्रोफाईल तयार केले होते. त्याद्वारे तो श्रीमंत महिला व आयटीतील महिलांशी संपर्क साधत असे. त्यानंतर महिला व तरुणीना लग्नाचे आमिष दाखवुन त्यांच्याशी  जवळीक निर्माण करीत असे. त्यानंतर त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असे. याच पद्धतीने अनेक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसानी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT