Old-People 
पुणे

गरज ज्येष्ठांनी ‘केअर’ घेण्याची...

धनंजय बिजले

कोथरूड परिसरात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या बंगल्यात घुसून त्यांना मारहाण करून सोन्यासह ऐवज चोरून नेण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र या वृद्ध नागरिकाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती, केअर टेकर चालक व त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले, हे तर अधिकच गंभीर आहे. यातून शहरात राहणाऱ्या लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पुणे राहण्यासाठी देशात सर्वांत सुरक्षित शहर मानले जाते. सरकारी, खासगी नोकरी किंवा उद्योग-व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर बहुतांश ज्येष्ठ नागरिक पुण्यात राहण्यास पसंती देतात. त्यामुळेच ‘पेन्शनरांचे शहर’ अशीही पुण्याची वेगळी ओळख आहे. ती आजही कायम आहे. सध्याच्या घडीला शहरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सात ते आठ लाखांच्या आसपास आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकदा वृद्ध नागरिकांची दैनंदिन कामे, त्यांच्या नियमित गरजांकडे मुले, सुना व नातवंडांकडून त्यांच्या कामाच्या व्यग्रतेमुळे दुर्लक्ष होते. कुटुंबातील सदस्यांकडून वृद्धांची किरकोळ कामे केली जात नाहीत. अनेकांची मुले शिकून परदेशात स्थायिक झाली आहेत, तर काही जणांची मुले वेगळी राहतात. त्यामुळे अनेक ठिकाणी भल्या मोठ्या बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये केवळ वृद्ध दांपत्य राहत असल्याचे पाहायला मिळते. शहरात अशाप्रकारे एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांना औषधोपचारापासून ते विविध प्रकारच्या सोई-सुविधेसाठी ‘केअर टेकर्स’ची गरज भासते. त्यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक जवळच्या ‘केअर टेकर्स एजन्सी’कडे कामगारांची मागणी करतात, तसेच या एजन्सी कामगार पुरवितात. मात्र, अशा एजन्सी खरोखरच मान्यताप्राप्त आहेत का, त्यांनी ज्येष्ठांची सेवा-सुश्रृषा करण्यासाठी पाठविलेल्या कामगाराने आवश्‍यक अभ्यासक्रम केलेला आहे का, अनुभव व शैक्षणिक पात्रता, स्वभाव कसा आहे, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का अशा काही महत्त्वाच्या गोष्टींची पडताळणी आवश्‍यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या साऱ्या बाबींची वेळोवेळी तपासणी करणे आवश्‍यक आहे.

गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी
खरे तर ‘केअर टेकर्स’ने मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच संवेदनशीलही असले पाहिजे, पण बहुसंख्य केअर टेकर्सचा उद्देश केवळ पैसे कमावणे हाच असतो. त्यांना ज्येष्ठांविषयी कुठलीही आत्मीयता नसते. त्यामुळेच अनेकदा असे अनुचित प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी खरे तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घरी नव्याने आलेल्या ‘केअर टेकर्स’ किंवा घरातील अन्य कामगाराविषयीची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न होत नाहीत. शहरातील वृद्ध नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्याचे काम काही एजन्सींकडून केले जाते. मात्र, काही एजन्सींकडून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले जाते. काही एजन्सी किंवा त्यांच्याकडील कामगारांची अधिकृत नोंदणी नसते. या पार्श्‍वभूमीवर गैरप्रकार करणाऱ्या केअर टेकर एजन्सींचा शोधू घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्याचे, तसेच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नुकतेच ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. ही सर्वांसाठी नक्कीच दिलासादायक व आश्‍वासक बाब आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यावश्‍यक आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या आसपास राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केली पाहिजे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांचा स्वतंत्र ‘व्हॉटसॲप ग्रुप’ तयार करणे पोलिसांना सहज शक्‍य आहे. यातून या वृद्ध नागरिकांना पोलिसांशी सहज संपर्क ठेवणे शक्‍य होईल. यातून अनेक गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. 

पडताळणी गरजेची
पोलिस त्यांचे काम चोख करतीलच, मात्र नागरिकांनीही स्वतः काही प्रमाणात दक्षता बाळगली पाहिजे. नागरिकांनी, त्यांच्या नातेवाइकांनी तसेच ते राहात असलेल्या सोसायटीचे पदाधिकारी, सदस्यांनीही काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. सेवा शुश्रूषा करण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती किंवा घरातील अन्य कामांसाठी ठेवलेल्या  व्यक्तींची पडताळणी करून घ्यावी. अनोळखी व्यक्तींना कामावर ठेवू नये. समजा तशी वेळच आली, तर त्या व्यक्तीची सारी माहिती घ्यावी. त्याचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, छायाचित्र घ्यावे. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस व नागरिकांच्या समन्वयातूनच ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित होणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडायला हवी, तर हे घडणे सहज शक्‍य आहे.

ज्येष्ठांनो, ही काळजी घ्या!

  • पडताळणी झालेल्या व्यक्तींनाच कामावर ठेवावे. 
  • कामावरील व्यक्तींची इत्थंभूत माहिती स्वतःजवळ ठेवावी. 
  • मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, छायाचित्र घ्यावे. 
  • अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT