Attempt to snatch jewelry hitting womans head with stones at the Lohegaon 
पुणे

महिलेच्या डोक्‍यात दगड मारून दागिने हिसकावण्याचा प्रयत्न ; लोहगावमधील घटना

सकाळवृत्तसेवा

पुणे : पादचारी महिलांचे दागिने हिसकावण्याचे सत्र शहरात अजूनही सुरूच आहे. लोहगाव भागात 55 वर्षाच्या महिलेच्या डोक्‍यात दगड मारून चोरट्यांनी त्यांचे दागिने दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेच्या डोक्‍याला जखम झाली असून त्यांनी याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोहगाव भागातील निंबाळकरनगर परिसरात सोमवारी (ता.12) दुपारी चारच्या सुमारास तक्रारदार या दूध घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला धक्का दिला. त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या डोक्‍यात दगड मारून त्यांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने दागिने हातात पकडून आरडाओरडा केल्याने तेथे नागरिक जमा होऊ लागले. लोक येत असल्याचे समजल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानाजवळ मंगळवारी (ता. 13) सकाळी साडेसातच्या सुमारास एका महिलेचे 30 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. 52 वर्षीय महिलेने या बाबत खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तरुणाचा मोबाईल हिसकावला 
पायी फेरी मारण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाच्या हातातील 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी दुचाकीवरून येत हिसकावला. डेक्कन जिमखाना परिसरात मंगळवारी (ता.13) रात्री आठ वाजता ही चोरी झाली. या प्रकरणी तनय ऋषीपाठक (वय 20, रा. सेनापती बापट रस्ता) यांनी डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली आहे.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT