पुणे

...तरीही पुण्यातील महात्मा फुले मंडईची दुरावस्थाच!

महेश जगताप

स्वारगेट (पुणे) : महात्मा फुले मंडईत दुरुस्ती व डागडुजीसाठी चार महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाने 68 लाखांची निविदा काढली आहे. तरीही मंडईची दुरवस्था का? हा पैसे मंडईच्या डागडुजीसाठी वापरतात की अधिकाऱ्यांच्या देखभालीसाठी वापरतात? असा प्रश्न मंडईतील व्यापारी वर्ग विचारत आहे. 

गेली अनेक वर्ष मंडईची दुरावस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळणे, पत्रे मोडकळीस आलेले, स्वच्छतागृहाचा अभाव, बऱ्याच ठिकाणी इमारतीला तडे गेले. यामुळे हेरिटेज विभागाने या दुरुस्ती कामासाठी सप्टेंबर महिन्यात 68 लाख रुपयांची निविदा काढली आहे. पण प्रत्यक्ष काम पाहिले असता याठिकाणी आतापर्यंत फक्त बारा पत्रे टाकले आहेत. यात सुरक्षेची काळजी न घेता त्याची डागडुजी केली आहे. पावसाळ्यात पाणी गळतीसाठी जे उपाय केले आहेत. ते एका मंडईच्या कोपऱ्यात केलेले दिसून आले आहेत. महात्मा फुले मंडई ही संपूर्ण पावसाळ्यात गळत होती. मग यांनी कोणते काम केले? असा सवाल मंडईतील व्यापारी प्रमोद शिर्के यांनी केला. 

याशिवाय कौलारूचा कुठेतरी कोपऱ्यात डागडुजी केलेली दिसून येते. त्याचबरोबर महिलांसाठी शौचालय करण्याची मागणी असता जुन्याच शौचालयाच्या भिंतीचे काम हेरिटेज विभाग करत आहे. त्याचबरोबर टेंडर निविदा ही मंडईत सार्वजनिक ठिकाणी काम सुरू होताना लावावी लागते. मग ती टेंडर निविदा का लावली नाही? असा संतप्त सवाल व्यापारी वर्गाकडून होत आहे. ही 68 लाखांची निविदा आम्हाला चार महिने झाले तरी आम्हाला याबाबतची कल्पनाही अधिकारी लागू देत नाहीत. त्यामुळे आमच्या मनात या कामाबद्दल शंका उपस्थित होत आहे. 

या कामात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत आहे तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही हे निकृष्ट व तोंडाला पाने पुसण्याचे काम होऊ देणार नाही. 

आम्ही मंडईच्या डागडुजीची कामे करत आहोत. तरी सर्व कामे मार्चपर्यंत आम्ही पूर्ण करू. यामध्ये कोणतीही कसूर केली जाणार नाही, असे हेरिटेज विभागाच्या मुख्य अभियंता हर्षदा शिंदे यांनी सांगितले. 

68 लाख रुपयांची निविदा निघाल्याचे समजल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. मंडईची एवढी दुरावस्था असताना इतक्या दिवसांपूर्वी निघालेली निविदा असूनही कोणतीच कामे केली नाहीत. हे पैसे हडप होणार कोण कोणतेही काम मार्गी न लागता अशी जास्त शक्यता निर्माण झाली आहे, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT