Demand_School_Admission 
पुणे

विद्येच्या माहेरघरात घडला धक्कादायक प्रकार; पाचवीच्या अॅडमिशनसाठी मागितले अडीच लाख!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर शाळेत इयत्ता ५वीला प्रवेश घेण्यासाठी एका पालकाकडे तब्बल अडीच लाख रुपयांचे शुल्क मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात १ लाख रुपयांचे डोनेशन त्रयस्थ व्यक्तीच्या बँक खात्यातून भरायला सांगण्यात आले आहे. यासंदर्भात संस्थेने याबाबत चौकशी केली जाईल असे स्पष्टीकरण दिले आहे. 

सध्या शाळांची शुल्क वाढ आणि शुल्क भरण्यावरून संस्थांची अरेरावी समोर येत आहे. त्यातच आता शाळा ही नवीन प्रकार समोर आला आहे. एका टँकरचालकाच्या मुलाला इयत्ता ५वीमध्ये प्रवेश द्यायचा आहे, त्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे. लाॅकडाऊन नंतर शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित पालक शाळेत गेले त्यावेळी त्यांना ५० हजार ४०० रुपये शुल्क, १ लाख रुपये डिपाॅजीट द्यायला सांगितले.

तसेच या संस्थेकडून कोकणात रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी १ लाख रुपये देणगी द्यावी, ही देणगी पालकांने त्यांच्या स्वतःच्या अकाऊंटमधून न देता, त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने डीडी काढून पैसे भरावेत असे सांगण्यात आले. याबाबत ही देणगी त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यातून का जमा केली जात आहे, याबाबत लोककल्याण ग्राहक संरक्षण समितीचे प्रवक्ता संदीप उदामले यांनी याबाबत शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिकांना याबाबत चौकशी केली. त्यांना ही याबाबत समाधानकारक उत्तर देताना आले नाही. त्याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे. लाॅकडाऊनमध्ये सर्वच जण अडचणीत आले असता अशा प्रकारे अडवणूक करणे व त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने डोनेशन घेणे चुकीचे आहे, असे उदामले यांनी सांगितले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव भरत व्हनकटे म्हणाले, "आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करतो, त्यावेळी ज्यांनी प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांकडून शुल्क व्यतरिक्त कोणतेही पैसे घेतले नाहीत. एखाद्या दुसरा प्रवेश अचानक होतो, तेव्हा लॅब किंवा इतर प्रकल्पांसाठी देणगी घेतली जाते. रुग्णालयाचा प्रकल्प जुना आहे, त्यामुळे त्यासाठी डोनेशन मागितले जात नाही. तसेच त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने डोनेशन मागितले गेले असल्याबाबत चौकशी केली जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT