lock down. 
पुणे

मांजरी, कदमवाकवस्ती, नऱहे, वाघोलीवरील बंदी आठ तासांत उठवली  

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावात आज पहाटेपासून ये-जा करण्यास घालण्यात आलेली बंदी आठ तासाच्या उठवावी लागली आहे. वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ही बंदी उठवण्यात येत असल्याची घोषणा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे. 


हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावात या पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारचे शासकीय, प्रशासकीय व खासगी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजपासून सात दिवस या चार गावात येजा करण्यास बंदी घातली होती. मात्र, वाघोली व मांजरी बुद्रुक या दोन्ही गावात सकाळपासूनच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच बारवकर यांनी वरील आदेश रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. 

पुणे व पिंपरी चिचवड शहरातून या चार गावात कोरोना प्रादुर्भआव होऊ नये, यासाठी आज पहाटे पाच वाजल्यापासून येत्या शुक्रवारी (ता. १२) रात्री बारा वाजेपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातून ये-जा कऱण्यास बंदी घातली होती. या आदेशाची अंमलबंजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी शनिवारी सकाळपासून मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत येणारे रस्ते बॅरीकेड लाऊन बंद करण्यास सुरुवात केली होती. 

मांजरी बुद्रुक व वाघोली गाव वगळता आसपासच्या सर्व गावात येजा करण्यास बंधन नसताना, केवळ याच दोन गावात मनाई सुरु केल्यास स्थानिक नागरिक व पोलिस यांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मांजरी बुद्रुक हद्दीत सकाळी दहा वाजल्यापासून अनेक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या प्रार्श्वभूमीवर पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT