पुणे

पुणे शहरात सारसबागेसह १२५ उद्याने बंदच;खुल्या असलेल्या बागांत नाताळ,थर्टी फर्स्टच्या कार्यक्रमांना मनाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात संसर्ग आटोक्‍यात असला तरीही; सारसबागेसह सव्वाशे बागा, उद्यानांना टाळेच राहणार आहे. ज्या भागांतील उद्याने खुली आहेत; त्याठिकाणी नाताळ आणि ‘थर्टी फस्ट’च्या तोंडावर नागरिकांसाठी बंधने असतील. ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना उद्यानांत फिरण्यास राज्य सरकारची परवानगी मिळेपर्यंत बागा व उद्याने बंद राहणार आहेत. 

या काळात बहुतांशी बागा, उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असून, त्याची प्राथमिक कामे हाती घेण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून बंद ठेवलेल्या दोनशेपैकी ८१ उद्याने दीड महिन्यांपूर्वी उघडली आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना प्रवेश नसतानाही या नियमाचे  सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याची भीती आहे. याबाबींची विचार करून दिवाळी आधीच सारसबाग बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्याने खात्याने घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा असेल आणि या आजाराचे रुग्ण वाढण्याची भीती होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अटोक्‍यात असल्याने बागा, उद्याने उघडण्याचा आग्रह नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे. परंतु, उद्यानांत ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा वावर दिसून येत असल्याने तूर्तास सर्व बागा-उद्याने उघडणे शक्‍य नाही, असा अभिप्राय महापालिकेच्या उद्यान खात्याचा आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी; ती बंदच राहतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

देखभाल-दुरुस्तीच्या कामांची गरज  
शहरात सलग दहा महिन्यांपासून बागा, उद्याने बंद ठेवल्याने काही ठिकाणी देखभाल-दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आणखी आटोक्‍यात आल्यास १५ जानेवारीनंतर काही उद्याने खुली होऊ शकतील, असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी उद्यानांत येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशावर काही बंधने घातली आहे. परंतु, त्याचे उल्लंघन होत असून मास्क न वापरणे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’कडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी उद्याने पूर्णपणे बंद असतील. 
-अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT