beneficiary of municipal accident insurance for Pune citizens
beneficiary of municipal accident insurance for Pune citizens 
पुणे

पुणेकरांनो, व्हा पालिकेच्या अपघात विम्याचे लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना मोफत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियाला पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. शहरातील निवासी मिळकत कर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा कर भरणारा प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

चालू आर्थिक वर्षात (2019-20) आजअखेर या योजनेंतर्गत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे एकूण 54 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 30 जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यानुसार या सर्वांना मिळून 1 कोटी 20 लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात आली असल्याचे या कंपनीचे पुणे विभागीय उपमहाव्यवस्थापक के. व्ही. आर. कृष्णा यांनी गुरुवारी (ता.27) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विभागीय व्यवस्थापक बी. स्वामिनाथन, प्रीती सोवनी, सहायक व्यवस्थापक गोपालकृष्णन आणि मंडल व्यवस्थापक मुकुंद पुराणिक आदी उपस्थित होते.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना डबल शिक्षा द्या : केजरीवाल

कृष्णा म्हणाले, "महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने ही विमा योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या शहरातील मिळकतकर धारकास किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास पाच लाख रुपये विमा रक्कम दिली जाते. कुटुंबात मिळकतकर धारकांचे आई-वडील, पत्नी आणि 23 वर्षे वयाच्या आतील मुले आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये आणि आई-वडील किंवा 23 वर्षाच्या आतील मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यास अडीच लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यास, औषधोपचारासाठी 1 लाख रुपये आणि रुग्णवाहिकेसाठी तीन हजार रुपये देण्यात येतात.''

धक्कादायक ! मारुन नाल्यात फेकलेल्या कॉन्स्टेबलच्या अंगावर चाकूचे १८ वार 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील आर्थिक वर्षाचा (2018-19) मिळकत कर भरलेला असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, या उद्देशाने युनायटेड कंपनीने जगदीश शिरापूरकर आणि सुप्रिया जाधव या दोन प्रतिनिधींची खास नियुक्ती केली आहे. हे प्रतिनिधी पात्र लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करून प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही कृष्णा यांनी सांगितले.

Delhi Violence : आप नेत्यावर संशयाची सुई; पक्षातून हकालपट्टी

योजनेचे निकष
- लाभार्थी मिळकतकरधारक असणे बंधनकारक
- गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवा शुल्क भरणारे नागरिकही पात्र
- मागील आर्थिक वर्षाचा मिळकत कर भरलेला असावा
- अपघात हा 1 एप्रिल 2019 ते 28 मे 2020 या कालावधीतील असावा
- योजना फक्त अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासाठी मर्यादित
- नैसर्गिक किंवा आजारपणाने मृत्यू झालेल्यांना लाभ मिळत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT