Best Before Mentioned should be made of on sweets is mandatory 
पुणे

मिठाईवर 'बेस्ट बिफोर'चा उल्लेख हवाच!

सकाळवृत्तसेवा

पुणे : दाण्याचे लाडू असो की, बर्फी या आणि अशा प्रकराच्या प्रत्येक मिठाईच्या लेबलवर 'बेस्ट बिफोर' ठळकपणे नमूद करण्याचे बंधन 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकारण'ने (एफएसएसआय) घातले आहे. येत्या गुरुवारपासून (ता. 1) याची अंमलबजाणी देशभर सुरू होईल. 

आपण मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर त्यांच्या समोरील ट्रेमधून पदार्थ घेतला जातो. त्याचे वजन करून मिठाईचे पॅकिंग करून आपल्या हातात दिला जातो. पण, आतापर्यंत यावर कधी हे "बेस्ट बिफोर' हे प्रसिद्ध केले जात नव्हते. हा पदार्थ किती दिवसापर्यंत चांगला राहू शकतो, हे त्यातून नेमकेपणाने ग्राहकांना कळत नव्हते. त्यासाठी हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पोटात जाणारा अन्नचा प्रत्येक घास सुरक्षितच असला पाहिजे, असा आग्रह आता धरला जात आहे. त्यासाठी हा आदेश दिला आहे. 

देशातील अनेक दुकानांमधुन गोड पदार्थांची कोणतेही पॅकेजिंग न करता विक्री होते. त्यावर लेबल नसते. काही दुकानांमधुन छोट्या प्लॅस्टिक बॉक्‍समध्ये गोड पदार्थांचे पॅकेजिंग करून विक्रीसाठी उपलब्ध केले जाता. त्यावर ते अन्न पदार्थ नेमका दिवसांपर्यंत चांगले (बेस्ट बिफोर) याची उल्लेख नसतो. या नव्या आदेशाप्रमाणे उत्पादकांना अन्न पदार्थाच्या लेबलवर "बेस्ट बिफोर'चा उल्लेख करणे बंधनकारक होणार आहे. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

या आदेशामुळे ग्राहकांना खुल्या मिठाईची मुदत नेमकेपणाने कळेल. त्यामुळे आपण ही मिठाई किती दिवसांपर्यंत खाऊ शकतो, तसेच ती दुकानदाराने कधी तयार केली आहे, याची माहिती ग्राहकांना मिळावी असा यामागचा उद्देश असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) अधिकाऱयांनी दिली. 

याबाबत एफडीए आयुक्त अरूण उन्हाळे म्हणाले, "मिठाईच्या दुकानांमधून उघड्यावर होणारी अन्नपदार्थांची विक्री या नवीन आदेशामुळे थांबण्यास मदत होईल. मिठाईच्या दुकानांमधील ट्रेसमोर त्या पदार्थाची मुदतीची तारीख (एक्‍सपायरी डेट) आता द्यावी लागणार आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्यात येईल.'' 

पुणे : जम्बो कोविड सेंटरमधली तरुणी पिरंगुटच्या घाटात पोहोचली कशी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT