bhama askhed 
पुणे

पुण्याच्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड आंदोलकांनी पाडले बंद   

रुपशे बुट्टे

आंबेठाण (पुणे) : मागण्या प्रलंबित असताना आणि ठरल्याप्रमाणे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे असतानासुद्धा पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम सुरू केल्याने भामा आसखेड आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी काम बंद पाडले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात ठरल्याप्रमाणे शासन वागत नसल्याची तीव्र प्रतिक्रिया या वेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

खेड तालुक्यातील आसखेड खुर्द गावच्या हद्दीत सुरू करण्यात आलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकऱ्यांना विचारात घेऊन पुढील कार्यवाही व्हावी, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सत्यवान नवले, शांताराम शिवेकर, नथू धंद्रे, विलास नवले, अजय नवले आदी उपस्थित होते.
       


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा, या प्रमुख मागण्यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे ताबे मिळावेत, वाढीव मोबदला मिळावा आणि बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करून काम बंद पाडले होते.

तत्कालीन पालकमंत्री, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात ठरल्यानुसार एक किलोमीटर जलवाहिनीचे काम थांबवून अन्य काम सुरु करण्याचे ठरले होते आणि तसे झालेही. परंतु आज (ता. 1) अचानक हे कामही सुरू केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ते बंद पाडले. त्यानंतर शेतकऱ्यांना चाकण पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'पिक्सिस पायोनियर' जहाज LPG घेऊन मंगळूर बंदरात दाखल

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT