Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत शहरातील आठही मतदारसंघावर ताबा कायम ठेवला आहे. शिवसेनेने दबाव तंत्र वापरले असले त्याचा काहीही फरक भाजपवर पडलेला नाही.
मंगळवारी दुपारी भाजपने १२५ जणांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यात कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरवले आहे. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक, पर्वतीतून शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून आमदार जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर आणि खडकवासल्यातून आमदार भीमराव तापकीर यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे.
कॅन्टोन्मेंट मधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.
Vidhan Sabha 2019 : विजय काळे यांचा पत्ता कट
शहरातील आठ पैकी पाच आमदारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यात गिरीश बापट खासदार झाल्याने तेथे बदल अपेक्षित होता. कोथरूड मध्ये अनपेक्षितपणे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने मेधा कुलकर्णी यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पण यामध्ये सर्वात जास्त फटका शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांना बसला आहे. त्यांची थेट उमेदवारी काढून घेऊन माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना उमेदवारी दिली आहे. काळे यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Vidhan Sabha 2019 : भाजपकडून 12 विद्यमान आमदारांना डच्चू; यादी जाहीर
यादीत कोथरूड दोन क्रमांकवर
भाजपच्या यादीची सुरूवात मुख्यमंत्र्यांपासून केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-उत्तर हा मतदारसंघ पहिला आहे. त्यानंतर कोथरूडला महत्व दिले असून चंद्रकांत पाटील यांच्या नावामुळे कोथरुडचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
यानंतर मतदारसंघ क्रमांकानुसार उमेदवारांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.