BJP-Gopichand-Padalkar
BJP-Gopichand-Padalkar 
पुणे

Vidhan Sabha 2019 : बारामतीतील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवा : पडळकर

सकाळ वृत्तसेवा

बारामती : शहरातील मतदान केंद्रावर बोगस मतदानासह दादागिरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने येथील सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही पुरवावा, अशी मागणी भाजपचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली.

शनिवारी (ता.19) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीकडून दादागिरी होण्याची भीती व्यक्त करत प्रत्येक मतदान केंद्रावर कॅमेऱ्याची नजर असावी आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक असावी, असे मत व्यक्त केले. 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, महानंदचे दिलीप खैरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, चंद्रराव तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, प्रशांत नाना सातव, अँड. नितीन भामे आदी उपस्थित होते. 

पडळकर म्हणाले, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा किल्ला ढासळणारच आहे, बारामतीतही मतदारांनी परिवर्तनाची हाक दिली असून मी विधानसभेत नक्की जाणार आहे. मला बारामतीकरांच्या माध्यमातून विधानसभा दिसत आहे, तर अजित पवारांना जवळच असलेले ऑर्थर रोडचे कारागृह दिसत आहे. भाजपच्या विकासाच्या राजकारणाला पाठबळ देण्याचे काम बारामतीकर जरुर करतील, भावनिक आवाहनांना मतदार भुलणार नाही. 

बारामती मतदारसंघातील गावागावातून तसेच शहरातूनही मला चांगला प्रतिसाद मिळाला. बारामतीकर मतदार आता परिवर्तनाच्या प्रतिक्षेत आहे. टंचाई निवारणासह कऱ्हा-नीरा नदीजोड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, त्यामुळे विकासाच्या मुद्यालाच बारामतीकरांनी पाठबळ द्यावे, असेही आवाहन पडळकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT