Chandrakant_Patil 
पुणे

'रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा प्रकार'; चंद्रकांत पाटीलांची 'विनाशकाले विपरीत बुद्धी'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका म्हणजे विनाश काली विपरीत बुद्धी, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर "रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा हा प्रकार आहे,' अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. 

पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. दरम्यान रविवारी (ता.२२) महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, अमोल कोल्हे पुण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांच्या वक्तव्यांचा या सर्व नेत्यांनी कडक भाषेत समाचार घेतला. पवार यांनी तर भाषणात अनेकदा 'चंपा' असाच उल्लेख केला. 

पवार म्हणाले, "ज्यांची योग्यता, पात्रता नाही; त्यांना कोणाबद्दल काय आणि कसे बोलावे, हे कळत नाही. ते कसेही बारळतात. देश आणि राज्यात गेली पन्नास वर्ष शरद पवार यांनी मोठे काम केले आहे. सर्वच बाबींची जाण असणारे नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला आजही मान आहे. त्यामुळे पवार यांच्याबद्दल असे बोलणे पाटील यांना शोभणारे नाही." 
तर कोल्हे म्हणाले," रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा हा प्रकार आहे. त्यांच्या अशा टीकेने कसलाही फरक पडत नाही.'' तर दिलीप पाटील यांनी ही आपल्या भाषणातून पाटील यांचा समाचार घेतला.

दिवाळीत आणि त्यानंतर पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी पाहून "बाजीराव रस्यावरची लोकांची तुडुंब गर्दीत कोरोना चेंगरून मेला असेल,' असे सांगत पवार यांनी पुणेकरांच्या बेजबाबदारपणाबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना संपला नाही, काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले. 

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावर बोलण्याऐवजी "पकोडे तळा' असा सल्ला तरुणांना देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून देणार का, असा सवाल पवार यांनी पदवीधरच्या मतदारांना केला. 

पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाहिजे," असे सांगून पवार म्हणाले," गेल्या निवडणुकीत फेऱ्यावर फेऱ्या मोजून अधिकारी देखील वैतागले. अखेर वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी "चंपा' विजयी झाल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे तर हे निवडून आले.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs BAN 1st Test: याला म्हणतात दणक्यात कमबॅक; १३० वर्षांपूर्वीचा विक्रम केला उद्ध्वस्त; कोण आहे Simon Harmer?

Eknath Shinde Helicopter Glitch : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूर दौऱ्यात परतीच्या प्रवासाआधीच मोठी धावपळ

Marathi News Live Updates : नागपुरात ठाकरे गट आक्रमक! बाळासाहेबांच्या फोटो विटंबनेविरोधात निषेध

Muslim Population: 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून इस्लाम सर्वात मोठा धर्म बनणार? प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल; भारतात काय परिस्थिती असेल?

Chakur News : दुष्काळी संकटात सरकार आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम करावे; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT