पुणे

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

डी. के. वळसे-पाटील

मंचर : विहिरीत बुडालेल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण वडिलही बुडू लागल्यामुळे त्यांनी विहिरीतील पाईपाचा आधार घेतला. काही क्षणातच मुलगा पुन्हा विहिरीत बुडाला. आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गावाच्या उत्तर बाजूला माथावस्ती येथे हि घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव कृष्णा सखाराम शेळके (वय १८, मूळ गाव परभणी) आहे. मजूर करून गुजराण करणाऱ्या कुटुंबातील हा मुलगा आहे. रात्री सात वाजेपर्यंत तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले नव्हते.

गावडेवाडी व टाव्हरेवाडी या दोन गावाच्या हद्दीवर पांडुरंग बाबुराव गावडे यांच्या मालकीची विहीर आहे. शेळके कुटुंब परिसरात शेतमजूर म्हणून काम करत आहेत. पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी कृष्णा विहिरीवर गेला होता. तोल गेल्यामुळे कृष्णा विहीरीत पडल्याचे पाहून एका मुलीने पळत जावून हि माहिती जवळच असलेल्या शेतात काम करत असलेल्या त्याचे वडील सखाराम भीमराव शेळके यांना सांगितली. वडील व त्याचे मामा अर्जुन सावळे (वय २१, रा.परळी वैजनाथ जि. बीड) या दोघांनी विहिरीत उड्या टाकल्या. वडिलांनी कृष्णाला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने वडिलांनाच मिठी मारली. त्यामुळे वडीलहि पाण्यात बुडू लागले. प्रसंगावधान राखून वडील सखाराम यांनी पाईपाला पकडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. 

विहिरीत पन्नास फूट खोल पाणी आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. वनखात्याच्या पथकातील तरुणांनी  कृष्णाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही.  या घटनेबाबत एनडीआरएफला कळविण्यात आले आहे. पण सदर पथक शनिवारी (ता. ७) सकाळी येणार असल्याचे सांगण्यात आले. मुलगा कृष्णाला पोहता येत नव्हते, अशी माहिती शेळके कुटुंबियांनी सांगितली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! मुंबईतील दोन नामांकित शाळांना धमकीचा मेल, संपूर्ण परिसर रिकामा

लाल शालू, केसात गजरा... अखेर सामंथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; लग्नाचे फोटो पाहिलेत का?

Ramraje Naik-Nimbalkar: सर्व पालिकांचे निकाल एकाच दिवशी घ्यावेत : रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण निवडणुकीबाबत काय म्हणाले ?

CM Yogi Adityanath : योगी सरकारचा महिलांसाठी ‘फुल सपोर्ट मॉडेल’ मुलींसाठी शिक्षण, विवाह मदत आणि मालमत्ता सवलत एकाच चौकटीत

Latest Marathi News Live Update: पर्यावरण संतुलनासाठी रमेश शेवाळे यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात

SCROLL FOR NEXT